4 burglaries in one night in Dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुळ्यात एकाच रात्रीत 4 घरफोड्या; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : आर्णी (ता. धुळे) येथे रात्री अडीच ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी करत रोकडसह सोने-चांदीचे दागिने, पितळाची भांडे असा लाखोंचा ऐवज लंपास केला. शनिवारी (ता. १९) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (4 burglaries in one night in Dhule crime news)

आर्णी येथील अमृत नाना कोळी यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात शेतीसाठी ठेवलेले ८० ते ८५ हजारांची रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी सिंधूबाई कोळी यांच्या घराकडे मोर्चा वळवत तेथे डल्ला मारला.

तेथून १५ ते २० हजारांची रोकड, सोने-चांदीचे दागिने, घरातील तांबे-पितळाचे भांडे चोरट्यांनी लांबविले. तसेच किशोर त्रिभुवन यांच्या घरातून आठ ते दहा हजारांची रोकड व घरातील इतर वस्तू लंपास केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वसंत भिल यांच्या घरातून लहान मुलाचा कमरेचा चांदीचा करदोडा व इतर वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. दरम्यान, चोरट्यांनी गावातील विनोद त्रिभुवन यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्री. त्रिभुवन यांना वेळीच जाग आल्याने चोरट्यांनी धूम ठोकली.

सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप त्रिभुवन यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल महाजन व योगेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT