diwali bonus sakal
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : रेल्वे कर्मचाऱ्यांना 45 दिवसाचा बोनस; दसरा दिवाळी होणार गोड

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ विभागातील सुमारे तेरा हजार ९०० रेल्वे कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळाला आहे. बोनस कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने, रेल्वे कर्मचाऱ्यांची दसरा, दिवाळी गोड होणार आहे.

एकूण २४ कोटी २८ लाख २८ हजार २२६ रुपयांचा भरणा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. (45 days bonus to railway employees jalgaon news)

सुमारे १७ हजार रुपये कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळाले आहे. १८ ऑक्टोबरला रेल्वे बोर्डाने अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी पीएलबी जाहीर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होतास डी.आर.एम. इती पांडे यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ कार्मिक अधिकारी काझी यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी रात्रभर मेहनत घेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये बोनस वर्ग केले.

रेल्वे बोर्डाने पीएलबीची घोषणा केल्यापासून काही तासांच्या आत पीएलबी उत्तीर्ण करण्यासाठी खात्यात वेतनपत्रे जमा केली आहेत. त्‍यामुळे १३ हजार ९०० कर्मचाऱ्‍यांचे पीएलबीचे पेमेंट २४ कोटी २८ लाख २८ हजार २२६ कर्मचाऱ्‍यांच्या खात्यात जमा झाले आहे.

गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या १ हजार ९१ कर्मचाऱ्यांमधील पीएलबीचे वेतनपत्र १९ ऑक्टोबरला पेमेंट पास करण्यासाठी खात्यात जमा करण्यासाठी दाखल केले आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. भुसावळ विभागाची हद्द भुसावळ ते इगतपुरी, भुसावळ ते खांडवा, भुसावळ ते नागपूर दरम्यान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये कोणत्या क्रिकेटपटूला Google वर जास्त सर्च केलं? रोहित, विराट Top 10 मध्येही नाही...

Marathi Breaking News LIVE: आठवडाभरात दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार न केल्यास पालिका निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात मतदार यादींची होळी करणार - संदेश देसाई

Sangli Crime : ट्रकमधून पाच लाखांचे शस्त्रक्रिया साहित्य गायब; पोलिसांच्या चतुर कारवाईत तीन महिलांची कबुली, मोठा गुन्हा उघड

Manchar News : मंचर बाजार समितीतर्फे प्रति क्विंटल ५,३५८ रुपये शासकीय हमी बाजारभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलकडून १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित, कारण काय?

SCROLL FOR NEXT