Ravan Horse esakal
उत्तर महाराष्ट्र

अबब...घोड्याची किंमत 5 कोटी! ठरतोय सारंगखेडा यात्रेचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा

सारंगखेडा (जि. नंदुरबार) : नाशिक येथील सरदार स्टंड फार्मचे मालक असद सय्यद यांचा रावण हा घोडा सारंगखेडा यात्रेचे खास आकर्षण ठरू पाहत आहे. याला पाहण्यासाठी अश्व प्रेमींनी गर्दी केली आहे. 68 इंचीचा हा अश्व असून याची किंमत तब्बल पाच कोटी रुपये लावण्यात आली आहे.

रावणचा रूबाब राजासारखा

दिवसाला 5 लिटर दूध, 5 गावरान अंडे, एक किलो चणा डाळ, एक किलो गावरान तूप, चोकर, त्याचबरोबर एक किलो बाजरा सुका मेवा असे त्याचे खाद्य आहे. एखाद्या राजा-महाराजा सारखा रुबाब या रावणचा आहे, कारण त्याच्या देखभाल व स्वच्छतेसाठी साठी तब्बल पाच माणसे कामाला असतात. अशा या अश्वाला पाहण्यासाठी अश्व प्रेमी सारंगखेडा घोडेबाजाराकडे आकर्षित होत आहेत. संपूर्ण काळा व डोक्यावर पांढराशुभ्र टिळा यामुळे याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मारवाड जातीचा हा घोडा असून त्याला देव मन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पट्ठा, बाल भंवरी साफ अशी एकाहून एक अधिक शुभ लक्षण आहेत.

''किंमती प्रमाणचे आणि एखाद्या महाराजाला लाजवेल असा रावणचा रूबाब आहे. त्याला प्रति दिवसाला तीनशे रुपयांचे दूध द्यावे लागते, तर प्रति दिवसाला रावणला बाराशे ते पंधराशे रुपये खर्च असून त्याच्या देखभालसाठी पाच माणसे आहेत.'' - असद सय्यद, सरदार स्टंड फार्म मालक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पराभव भाजपच्या जिव्हारी, महायुतीत मिठाचा खडा! शिवसेना युतीधर्म पाळणार का? बन यांचा थेट शिंदेंना सवाल

Omprakash Bishnoi Viral News : सोशल मीडियावर २१ लाख फॉलोअर्स, पण निवडणुकीत मिळाली केवळ ३३ मते; राजस्थानमधील इन्फ्लुएन्सर चर्चेत

Tata Group: ट्रेंट-टायटनसह नोएल टाटा 6 कंपन्यांच्या बोर्डातून बाहेर पडणार! कारण काय? नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार?

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

Nuclear Lab Fire: अमेरिकेतील अण्विक प्रयोगशाळेत आग लागल्याने आणीबाणी जाहीर! काय आहे धोका?

SCROLL FOR NEXT