fund sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वलवाडीत रस्तेकामांसाठी 5 कोटी मंजूर : आमदार पाटील

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट वलवाडी परिसरात पाठपुराव्याअंती रस्ते विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दिली. वलवाडीतील विविध कॉलन्यांमध्ये रस्त्यांचा विकास केला जाईल. (5 crore sanctioned for road works in valvadi dhule news)

मंजूर पाच कोटींच्या निधीतून कॉलन्यांमध्ये डांबरीकरण, काही ठिकाणी गटांरीची कामे होतील. वलवाडीतील प्रभाग एकमधील ओमनगरमधील (सर्व्हे नं. २०) कॉलनीअंतर्गत ६० लाखातून रस्ता डांबरीकरण, बिजली नगरमध्ये (सर्व्हे नं.३४/२) दिलीप पाटील यांच्या घरापासून ते पौर्णिमा नगरमधील प्रभाकर साळुंखे यांच्या घरापर्यंत ते पौर्णिमा नगरमधील कूपनलिकेपर्यंत एक कोटींच्या निधीतून खडीकरण व डांबरीकरण.

चंद्रकोर कॉलनीतील आर. एस. चव्हाण यांच्या घरापासून ते चंद्रकोर कॉलनी, शाकुंतल सोसायटीपर्यंत ५० लाखांतून डांबरीकरण, प्रशांतनगरातील के. बी. पाटील यांच्या घरापासून ते चंद्रवेल फेज तीनपर्यंत ५० लाखातून डांबरीकरण, मोरया गृहनिर्माण सोसायटी बोर्डजवळील श्री गजानन महाराज मंदिर ते ज्ञानदिप कॉलनीतील चंद्रमा सोसायटी ते वलवाडी-नकाणे रोडवरील नीलेश राजपूत यांच्या दुकानापर्यंत, शिवनेरी कॉलनीतील संतोषनगर बोर्डाकडून कुवर मिस्तरी यांच्या घरापर्यंत ७० लाखांच्या निधीतून खडीकरण व डांबरीकरण.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिवप्रसाद कॉलनीतील महेंद्र अहिरराव यांच्या घरापासून ते इंद्रप्रस्थ कॉलनी ते राजेंद्र नगरमधील सचिन महाले यांच्या घरापर्यंत ८५ लाखांच्या निधीतून रस्ते विकास, धनदाईनगरातील श्रीराम चिल्ड्रन हॉस्पिटलपासून बोरसेनगरातील गणेश मंदिरापर्यंत ते पेट्रोलपंपापर्यंत रस्ता ते विद्युत प्रभा सोसायटी, सूर्योदय कॉलनी बोर्डपासून अण्णा मोरे यांच्या घरापर्यंत ८५ लाखांतून रस्ता होईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli : कोहलीने Puma सोबतचा करार संपवला; आता नव्या भारतीय कंपनीसोबत 40 कोटींची नवी इनिंग सुरू!

'बच्चे बडे हो जाते हैं, लीग खतम नही होती!' Wasim Akram ची आयपीएल वेळापत्रकावर टीका; म्हणाला, PSL No. 1

Password Psychology: लोक एक्सच्या नावाचा पासवर्ड का ठेवतात? मानसशास्त्र सांगतं ३ मोठी कारणं

lawyer Rakesh Kishor assaulted in Court Video : माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वरिष्ठ वकिलास न्यायालयाच्या आवारातच चपलेने मारहाण!

Self-Priority Tips: थोडंसं स्वार्थी होणं कधी योग्य? जाणून घ्या त्या 5 परिस्थिती ज्या वेळी स्वतःलाच प्राधान्य द्यायला हवं...

SCROLL FOR NEXT