robbery esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिरपूरमध्ये घरफोडीत 5 तोळे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील गुरुदत्त कॉलनीत अज्ञात संशयितांनी घरफोडी करून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व रोकड असा मुद्देमाल नेला. या घटनेमुळे कॉलनी परिसरात खळबळ उडाली आहे. (5 tola jewellery looted in house burglary in Shirpur dhule crime news)

शिरपूर पंचायत समितीचे माजी बीडीओ हरिभाऊ दोरीक यांच्या घरात श्याम मुरलीधर पारीख (वय ६१) पत्नी सुनीतासह भाडेतत्त्वावर राहतात. ते पत्नीसह ५ जुलैला गुजरातमध्ये अंकलेश्वर येथे मुलगी पारुल शहा हिच्याकडे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दाराला लावलेले कुलूप कापले व गोदरेज कपाटाचे लॉक तोडले. कपाटात ठेवलेले दागिने, भांडी व रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

पारीख ९ जुलैला घरी परतल्यावर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी श्वानपथक मागविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही अंतरापर्यंत श्वानाने दिशा दाखविली. मात्र पाऊस झाल्याने चोरट्यांचा माग काढता आला नाही.

या घरफोडीत चोरट्यांनी २२ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, २५ ग्रॅम सोन्याच्या पाच अंगठ्या, चांदीच्या दोन वाट्या, दोन चांदीचे मोठे व दोन लहान ग्लास, चांदीची समई, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला.

या घरफोडीमुळे कॉलनी परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने छडा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT