esakal
उत्तर महाराष्ट्र

ZP Ideal Teacher Award : जिल्हा परीषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातील 6 शिक्षकांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

ZP Ideal Teacher Award : जिल्हा परीषदेतर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.

यात जिल्ह्यातील सहा जण शिक्षकांना आदर्श शिक्षक व तिघांना उत्तेजनार्थ पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण केले जाणार आहे. (6 teacher awarded as ideal teacher by zp nandurbar news)

विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षणासोबतच शाळेची प्रगती, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण योग्य वातावरण, विविध कार्यक्रम ,उपक्रम राबवून आदर्श शाळा तयार करणे व त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आदर्श शिक्षक देऊन गौरव करण्यात येतो.

त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शिक्षण विभागाने प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार पात्र शिक्षकांची पुरस्कारासाठी निवडीकरीता शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. नियम व निकषानुसार शिक्षण आयुक्तांकडून शिक्षकांची निवड सोमवारी (ता.४) घोषित करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुरस्कारार्थी आदर्श शिक्षक

रोहिणी गोकूळ पाटील (जि.प.शाळा लोय ता.नंदुरबार), बालकिसन विठ्ठल ठोंबरे (जि. प. शाळा ,आमलाण ता.नवापूर), डॉ. जितेंद्रगीर विश्‍वासगीर गोसावी (जि.प.शाळा टवळाई, ता.शहादा), समाधान गोविंद घाडगे (अमोनी,ता.तळोदा ), प्रवीणकुमार गंगाराम देवरे (जि.प.शाळा, लहान राजमोही ता. अक्कलकुवा), विजयसिंग मिठ्या पराडके (जि.प.शाळा, गौऱ्या ता.धडगाव).

उत्तजनार्थ पुरस्कारार्थी : ओमशेखर वैजनाथ काळा (जि.प.शाळा ,पाचोराबारी ता.नंदुरबार), नारायण तुकाराम नांद्रे (जि.प.शाळा, शनिमांडळ ता. नंदुरबार (मुली), श्रीमती विभावरी अर्जुन पाटील (जि.प. केंद्र शाळा,धडगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT