dhule medical collage esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हिरे मेडिकल कॉलेजसाठी शासनाकडून 60 कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

धुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी शासनाने ६० कोटी रुपये मंजूर केले अशी मागणी आमदार फारुक शाह यांनी दिली. (60 crore fund sanctioned by Govt for bhausaheb hire Medical College For building construction Dhule news)

शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात एमबीबीएसच्या इडब्लूएस कोटानुसार ५० जागा वाढणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयात इमारत व इतर सुविधांसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी प्राप्त झाली असून या निधीत ६० टक्के केंद्र सरकारचा वाटा असणार आहे.

सद्यःस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या सुविधा या पूर्वी असलेल्या क्षमतेसाठी असल्याने वाढीव जागांसाठी अधिक सुविधा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अधिकच्या सुविधेसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या दीड वर्षांपासून आपण प्रयत्नात होतो असे आमदार श्री. शाह यांनी म्हटले आहे.

शासनाच्या धोरणानुसार भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात एमबीबीएसच्या इडब्लूएस कोटासाठी ५० जागा वाढणार आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे अस्तित्वातील वैद्यकीय महाविद्यालयाची श्रेणी सुधार करणे अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून तसे पत्र केंद्र शासनाचे सहसचिव चंदन कुमार यांनी निर्गमित केले आहे. केंद्र शासनाचा हिस्सा सुमारे ३६ कोटी असणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

६० कोटीचा निधी मंजूर झाल्यामुळे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात विद्यार्थी संख्या वाढल्याने जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. तसेच वाढीव सुविधांमुळे रुग्णांनादेखील फायदा होणार असल्याचे आमदार श्री. शाह यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त! चांदीच्या भावतही घसरण; आजचा ताजा भाव पाहा

Satara Rain: साताऱ्यात पावसाची दमदार हजेरी! महाबळेश्वरमध्ये १६८ मि.मी. मुसळधार; पश्चिम भाग ओलाचिंब, पूर्वेकडील तालुक्यांत प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : शेलू येथील बंधाऱ्यावरून पुराच्या पाण्यामुळे दुचाकीस्वार गेला वाहून

बॉलीवूडची पुन्हा एकदा 'कॉपी पेस्ट'? आलिया-शर्वरीचा 'अल्फा' रिलीज होताच ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले...

Pandharpur News : पंढरपुरात धार्मिक स्थळावर दगडफेक, शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT