70 gram stone removed in 3 hours of surgery from buffalo dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : किचकट शस्त्रक्रियेनंतर दुभत्या म्हशीस जीवदान; 3 तासांच्या शस्त्रक्रियेत काढला सत्तर ग्रॅमचा दगड

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : म्हशीच्या पोटाची शस्त्रक्रिया करत अखाद्य वस्तू काढत पशुपालक शेतकऱ्यास मोठा दिलासा देण्याचे धाडसी काम साक्री तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले.

जिवापाड जपलेल्या पाळीव प्राण्यास जीवदान मिळाल्याने शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तब्बल तीन तास चाललेल्या किचकट शस्त्रक्रियेनंतर म्हशीची प्रकृती स्थिर आहे.

मृत्यूच्या दाढेतून म्हशीला जीवदान देणाऱ्या पशुवैद्यकीय पथकापुढे शेतकरी कुटुंब नतमस्तक झाले. (70 gram stone removed in 3 hours of surgery from buffalo dhule news)

आठ दिवसांपासून दुभत्या म्हशीने चारा-पाण्याचा त्याग केल्याचे पाहून ककाणी (ता. साक्री) येथील पशुपालक-शेतकरी भटू नामदेव बेडसे व कुटुंब हतबल होते. पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या म्हशीवर म्हसदी येथील पशुवैद्यकीय श्रेणी एकच्या दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. हेमंत महाले यांनी स्थानिक पातळीवर उपचार करत शर्थीचे प्रयत्न केले.

आजारी म्हैस उपचारास प्रतिसाद देत नसल्याने बेडसे कुटुंबाने धीर सोडला. अखेर पशुसंवर्धन विभागाच्या तालुक्यातील अनुभवी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. हेमंत महाले, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. सी. सैंदर (धमनार), डॉ. सी. एस. आव्हाड (खोरी), डॉ. वाय. के. बहिरम (बळसाणे), डॉ. मिथुन पावरा (राज्यस्तर पशुवैद्यकीय दवाखाना, साक्री), निवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. हंसराज देवरे (देऊर), डॉ. नीलेश भामरे (काळगाव) आदी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने क्षेत्रीय स्तरावर मेटल डिटेक्टरच्या (तपासणी यंत्र) सहाय्याने फॉरेन बॉडी निदान केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात पोटात अखाद्य वस्तू असल्याचे निदान झाल्यावर तीन तासांच्या शस्त्रक्रियेत सुमारे सत्तर ग्रॅम वजनाचा दगड, लोखंडाचा चुरा काढण्यात आला. शस्त्रक्रियेसाठी म्हसदी येथील दूध उत्पादक पशुपालक पालक शेतकरी एस. डी. देवरे, शेतकरी भटू नामदेव बेडसे, रावसाहेब धोंडू ठाकरे (काळगाव), मच्छिंद्र साहेबराव बेडसे, ज्ञानेश्वर भटू बेडसे, पिंटू गायकवाड आदींनी सहकार्य केले.

"योग्य वेळेस निदान झाल्यास पशुधन वाचते. चारा, पशुखाद्य देताना पशुपालकांनी विशेष काळजी घ्यावी. जनावरांना गंभीर आजार झाल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून उपचार घ्यावेत." -डॉ. हेमंत महाले, पशुधन विकास अधिकारी, म्हसदी

"दुभत्या जनावरांचा चारा व पशू आहारात नकळत दगड वा लोखंड गेल्याने दुभती जनावरे अडचणीत येतात. विशेषत: पशुपालक शेतकऱ्यांनी दुभत्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी." -एस. डी. देवरे, दूध उत्पादक पशुपालक, म्हसदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT