MSEDCL Electricity bill esakal
उत्तर महाराष्ट्र

Electricity Bill : वीजबिलाची 96 कोटींची थकबाकी; जिल्ह्यात 541 ग्रामपंचायतींची स्थिती!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींकडे पथदीव्यांच्या बिलापोटी वीज कंपनीचे ९६ कोटी ११ लाख थकले आहेत. तथापि, सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ चार महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी राज्य शासनाने १७ कोटी ६९ लाख दिले आहेत. ही रक्कम शासनस्तरावरून थेट महावितरणकडे वर्ग होईल. (96 Crore arrears of electricity bill Status of 541 Gram Panchayats in district nashik news)

ग्रामपंचायतींतर्फे पथदीपांचे वीजबिल वेळेवर भरले जात नाही. त्यासाठी पूर्वी ग्रामस्थांकडून दिवाबत्ती कर वसूल केला जात होता. तसेच बीआरजीएफ योजना अस्तित्वात असताना पथदीपांचे देयक चुकते करण्यासाठी निधीची तरतूद होती.

मात्र, शासनाने गावोगावी असलेल्या पथदीपांचे बिल भरणे बंद केले. त्यामुळे ग्रामपंचायतींसमोर पथदीपांचे वीजबिल कसे भरावे, असा प्रश्न उभा राहिला. वीजबिलांची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

कोरोना कालावधीत शासनाने पथदीपांचे वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींकडील पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामपंचायतींनी त्यास विरोध केला. त्यामुळे शासनाने हे आदेश परत घेतले. आता राज्य शासनाकडूनच पथदीपांच्या थकीत वीजबिलापोटी महावितरणकडे पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना थोडासा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ५४९ ग्रामपंचायतींकडे पथदीपांच्या वीजबिलापोटी ९६ कोटी ११ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी आता शासन भरणार आहे. पैकी सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ या चार महिन्यांतील पथदीपांच्या वीजबिलासाठी राज्य शासनाने १७ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT