dhule district collector abhinav goyal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्ह्यात अभिव्यक्ती मताची स्पर्धा; कॉलेजियन विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मताची स्पर्धा सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.

‘अभिव्यक्ती मताची’ या विषयांतर्गत जाहिरात निर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य अशा तीन स्पर्धा होतील.

यात जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिझम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयामधील (आर्ट कॉलेज) विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. (abhivyakti matanchi competition in the district calls for participation of college students by district collector news)

स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ असा आहे. तिन्ही स्पर्धांचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जाहिरात निर्मिती स्पर्धेत पहिले पारितोषिक एक लाख रुपये, दुसरे पारितोषिक ७५ हजार, तसेच तिसरे पारितोषिक ५० हजार आणि दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतील.

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेत पहिले पारितोषिक ५० हजार, दुसरे पारितोषिक २५ हजार आणि तिसरे पारितोषिक दहा हजार तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घोषवाक्य स्पर्धेत पहिले पारितोषिक २५ हजार, दुसरे पारितोषिक १५ हजार तसेच तिसरे पारितोषिक दहा हजार आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी पाच हजार देण्यात येतील.

युवा वर्ग आणि मताधिकारी; मताधिकार लोकशाहीचा स्तंभ; एका मताचे सामर्थ्य; सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका/जबाबदारी; लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार हे स्पर्धेचे विषय आहेत. ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात असेल.

स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT