Abuse of a minor girl Accused sentenced to hard labour dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल चौकशीचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : तालुक्यातील एका गावात लहान भावाचा खून करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

संदीप प्रेमलाल पाटील असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. (Abuse of a minor girl Accused sentenced to hard labour dhule crime news)

आरोपी संदीप पाटील याने डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान पीडितेवर अत्याचार केला. त्यामुळे पीडिताने दोन वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून २२ मार्च २०१९ ला धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायाधीश यास्मिन देशमुख यांच्या समक्ष खटल्याचे कामकाज सुरू होते.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी जाधव यांनी बाजू मांडली. संदीप पाटील याला १२ वर्षे सक्तमजुरी व २५ हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रकरणात अत्याचार झाला अथवा नाही याबाबत डॉक्टरांना मत व्यक्त करण्यास सांगण्यात आले होते.

मात्र, संबंधित डॉक्टरांनी मत व्यक्त केले नाही. त्यामुळे न्या. देशमुख यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असा आदेश दिला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी मार्गदर्शन केले. त्यांना सुशीला वळवी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने अमली पदार्थ सेवन केले होते का? पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली

एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळचे मंगेश चिवटेंच्या भावावर जीवघेणा हल्ला; भाजप नेत्यानेच सुपारी दिल्याचा दावा

Mumbai Local: मुंबईच्या रेल्वे प्रवाशांनो सावधान! लोकलच्या मार्गावर मध्यरात्रीपासूनच मेगाब्लॉक, प्रवासापूर्वी 'हे' वेळापत्रक पहाच

Latest Marathi News Live Update : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता

IND vs WI 1st Test Live: वेस्ट इंडिजचे ५ फलंदाज ४६ धावांत तंबूत! Ravindra Jadeja एवढा उत्साही झाला की, अपील करताना धडामssss पडला Video Viral

SCROLL FOR NEXT