Accident News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : उतारावर आतातरी उपाययोजना होणार का? महामार्ग प्राधिकऱणाने घ्यावी दखल...

सचिन पाटील

Dhule Accident News : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात महामार्गाद्वारे येताना बिजासन घाट ओलांडणे भाग पडते. या घाटापासून पळासनेरपर्यंत असलेला तीव्र उतार नेहमीच अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे.

या मार्गावर बळी गेलेल्यांची संख्या मोठी आहे.

महामार्गाच्या कामावेळी येथे उड्डाणपूल व्हावा किंवा मोठा भराव करावा अशी स्थनिकांची मागणी होती, मात्र तीही लक्षात घेतली गेली नाही आणि उतारावर उपायही केले गेले नाहीत, त्यामुळे अपघातांची ही मालिका संपण्यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचे आजच्या घटनेवरून पुनश्च अधोरेखित झाले आहे. (accident happens due to steep slope from Bijasan Ghat to Palasner dhule accident news)

महामार्गावर बहुतांशी अवजड स्वरुपाची वाहतूक चालते. उतारावर अशा वाहनांच्या केबिनवर मागील अवजड वजनाचा भार येतो. त्यामुळे वाहनांचा वेग कमालीचा वाढतो. प्रयत्न करूनही वाहनचालकांचे नियंत्रण सुटते.

अनेकदा तर उतार आणि पाठिमागचा भार यांच्यामुळे ब्रेक नादुरुस्त होतात. त्यात पळासनेरपर्यंतचा उतार सहजासहजी न दिसणारा मात्र गती अचानक वाढविणारा ठरतो. त्यामुळे चारणपाडा व पळासनेर हे अपघातांचे ब्लकस्पॉट म्हणून ओळखले जातात.

महामार्गावर प्रवासी वाहनांमधून होणारी वाहतूक व खासगी कारमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा ही वाहने अवजड वाहनांना ओव्हरटेक करीत वाहनांच्या गर्दीत पुढे शिरतात. या प्रयत्नात अवजड वाहनांची कोंडी होते. काही दुचाकीस्वार तर पेट्रोल वाचवण्यासाठी वाहन बंद करुन न्यूट्रल गिअरमध्ये चालवतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छोट्या वाहनांना साईड देण्याच्या किंवा धडकेपासून वाचवण्याची कसरत करताना चालकाचे उताराकडील लक्ष नाहीसे होते. परिणामी तीव्र उतारावरुन अवजड वाहन वेगाने खाली येते. त्याचा वेग अनियंत्रित झाल्यास पुढे जाणाऱ्या वाहनाला त्याची धडक अटळ असते. त्यातून अनेकदा जीवघेणे अपघात घडतात.

काही महिन्यांपूर्वी अभोणा (ता.कळवण) येथील एकाच गावातील चार जणांना ट्रक-कारच्या अपघातात जीव गमवावा लागला होता. असे अनेक अपघात घडत असून त्यात मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली आहे. त्यावर मलमपट्टी म्हणून महामार्ग विभाग, टोलवे कंपनीतर्फे गतिरोधकांची सलग मालिका लावण्यात आली आहे. मात्र उतारावरील वाहनाला रोखण्याकामी ते कुचकामी ठरले आहेत.

अतितीव्र उतारावर उपाय करा

अतितीव्र उतारावर अपघात नियंत्रणासाठी बिजासन घाट ते पळासनेरदरम्यान अवजड वाहनांना रस्त्याला लागून चढाव असलेली मातीची लहान मैदाने (ग्राऊंड स्पॉट) तयार करुन देणे आवश्यक आहे.

जेणेकरून वाहनांना तेथे आणून नियंत्रित करता येईल किंवा किमान अपघात टाळणे शक्य होईल. चारणपाडा येथील अपघाताने महामार्गावर वाहनांचे अपघात टाळण्यासाठी असलेल्या उपायांची कमतरता अधोरेखित केली आहे. किमान यापुढे तरी आणखी बळी जाऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवरील प्रयत्न अपेक्षित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT