molest 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

शौचालयाकडून दोघी घराकडे जाताना...'त्याने' दोघींचा रस्ता अडवला...कोणी आजूबाजूस नसताना...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : निफाड तालुक्‍यातील पालखेड येथील सोळावर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग करीत लैंगिक छळ केल्याची घटना घडली होती. दिवसेंदिवस घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्यासाठी पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयांमधून बाल लैंगिक अत्याचार आणि महिला अत्याचारांबाबत शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीदेखील वारंवार अशा घटना घडत असल्याने ही गंभीर बाबच म्हणावी लागेल.

झाले असे की...
3 मे 2013 मध्ये पीडित युवती तिच्या लहान बहिणीसह शौचालयाकडून रस्त्याने घरी जाताना आरोपीने लज्जास्पद भाषा वापरून, वर्तन करून घरातील सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलिस उपनिरीक्षक एम. बी. जोगन यांनी अटक व तपास करून आरोपीविरुद्ध निफाड न्यायालयात खटला दाखल केला होता. खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदारांची साक्ष सहाय्यक जिल्हा सरकारी वकील ऍड. रमेश कापसे यांनी नोंदविली. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. 

ही झाली आरोपीस शिक्षा..
या आरोपावरून भारत भीमा कडाळे (वय 27, रा. पालखेड) यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, तसेच अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली. अकरा हजार रुपये दंडापैकी एक हजार रुपये शासन जमा, तर दहा हजार रुपयांची दंडाची रक्कम नुकसानीदाखल पीडितेस देण्याचे आदेश दिले आहेत. 

हे माहित आहे का तुम्हाला?
एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजागीपानाच्या अधिकाराचं उल्लंघन होईल असे वर्तन. या अपराधासाठी १ वर्ष सजा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing : सेन्सेक्स 151 अंकांनी घसरला तर निफ्टी 25,950 अंकांपर्यंत खाली, कोणते शेअर घसरले ?

५० जणांनी प्रपोज केलं पण लग्नासाठी एकानेही विचारलं नाही... वयाच्या कितव्या वर्षी लग्न करतेय तेजस्विनी लोणारी?

Latest Marathi News Live Update : मोंथा चक्रीवादळामुळे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, भारताच्या किनारपट्टीवर रेड अलर्ट

November Horoscope Prediction : येत्या महिन्यात तयार होतोय दुर्मिळ योग, तीन राजयोग एकत्रित असल्याने 5 राशींची लागणार लॉटरी

November 2025 Zodiac Success Prediction: मीन राशीत शनिचे भ्रमण, नोव्हेंबर महिन्यात कोणत्या राशींना मिळेल यश, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT