Dhule: Police team taking action against drunk drivers before New Year esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नववर्षापूर्वी मद्यपी 25 वाहनचालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : नववर्षाच्या स्वागतापूर्वी शहर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेकडून मद्यपी वाहन चालकांविरुद्धच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई राबविण्यात आली. गेल्या दोन दिवसांत २४ दुचाकीधारक आणि कारचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही वाहने जप्त करण्यात आली आहे.

अनेक वाहनचालक मद्य सेवनासह वाहन चालवितात. त्यामुळे अपघात होऊन निष्पापांचा जीव जाण्याचा धोका असतो, तर तर काहींना कायमचे अपंगत्व येऊ शकते. असे अनुचित प्रकार रोखताना मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाईचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शहर वाहतूक शाखेला दिला. (Action against 25 drunk drivers before New Year Dhule News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

त्यानुसार सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन, हवालदार रफीक शेख, सुधीर पाटील, चंद्रशेखर चंद्रात्रे यांच्यासह पथकाने दोन ते तीन दिवस विशेष मोहीम राबवीत मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली.

वाडीभोकर रोड, गोंदूर रोड, दत्त मंदिर, नेहरू चौक, सावरकर पुतळा यासह ठिकठिकाणी यंत्राद्वारे अल्कोहोल तपासणीतून मद्यसेवनातून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई झाली. ही कारवाई पुढेही सुरुच राहील, असे पोलिसांनी सांगितले. कुणीही मद्य किंवा अमलीपदार्थ सेवनातून वाहने चालवू नयेत. दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण करू नये, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT