The route through which the proposed bypass road will pass. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोद्यातील बायपास रस्त्याला प्रशासकीय मान्यता; 27 कोटी 17 लाखांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळोदा शहरातील बायपास रस्त्याच्या विकास प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी २८ कोटी १७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

शहादा रस्त्यावरून नंदुरबार रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ निघणाऱ्या या बायपास रस्त्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने हा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आहे.(Administrative Approval of Bypass Road in Taloda nandurbar news)

त्यामुळे शहरातील रहदारीच्या प्रश्नासाठी महत्त्वाच्या या रस्ताकामाला लवकरच सुरवात होणार आहे. तळोदा शहरातील वाढत्या रहदारीचा प्रश्न सोडविण्यासाठी नंदुरबार रस्त्याला जोडणारा बायपास रस्ता ही महत्त्वाची गरज नेहमीच चर्चेचा विषय असते. सध्या नंदुरबारकडे जाणारी वाहतूक एकमेव बसस्टॅन्डमागील रस्त्याने व शहरातून मेन रोडने होते.

मात्र त्या रस्त्यावर रहिवासी परिसर असल्याने तसेच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने विविध समस्या निर्माण होतात. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ निघणाऱ्या बायपास रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार तळोदा नगर परिषदेने रस्ते विकास प्रकल्प राज्यस्तरीय मान्यता समितीकडे सादर केला होता.

त्यास मान्यता मिळून या रस्ते प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार २८ कोटी १७ लाखांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. हा बायपास रस्ता शहादा रस्त्यावरून निघून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत राहणार आहे. यात रस्ता, गटार, रस्तादुभाजक व पेव्हर ब्लॉक बसविणे या कामासाठी २२ कोटी ७३ लाख ७० हजार ८०१ रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे.

विजेचे खांब स्थलांतर करण्यासाठी ५६ लाख ८४ हजार २७० रुपये व इतर आनुषंगिक खर्च धरून २८ कोटी १७ लाख १३ हजार १९१ रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या रस्ते प्रकल्पाच्या निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे शहराचा बहुप्रतीक्षित बायपास रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगरविकास विभागाकडून भरघोस निधी

आमदार राजेश पाडवी यांनी बायपास रस्त्याचा विकास दोंडाईचा येथील राजपथ रस्त्यासारखा करण्याचा मानस बोलून दाखविला होता. आता त्यांच्या संकल्पनेतून या रस्त्याचा विकास होणार आहे. त्यासाठी त्यांनी नगरविकास विभागाकडून भरघोस निधी आणला आहे.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी तळोदा पालिकेला मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील रहदारीसाठी हा बायपास रस्ता महत्त्वाचा असल्याने रस्त्याला मंजुरी मिळून निधीही मिळाल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT