Accident News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : हीट अँड रन प्रकरण, तब्बल 10 महिन्यांनंतर अपघाताचा गुन्हा दाखल!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा-दोंडाईचा राज्यमार्गावर विरदेल (ता. शिंदखेडा)जवळील नवनाथ मंदिरासमोर १५ जुलै २०२२ ला दुपारी साडेतीनच्या सुमारास मारुती स्विफ्ट डिझायर कार (जीजे ०६, एलके ७९६८)ने अचानक ब्रेक दाबल्याने समोरून येणाऱ्या मोटारसायकलवरील दोन तरुण जखमी झाले होते.

मोटारसायकल व मोबाईलचे नुकसान केल्याचा गुन्हा तब्बल दहा महिन्यांनंतर शुक्रवारी (ता. १९) दुपारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. (After Ten months Accident case filed Car bicycle collision on Shindkheda Dandi road Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रहीमपुरे (ता. शिंदखेडा) येथील दिनेश सुरेश बेडसे (वय २८, व्यवसाय) व मित्र विनोद रामराजे (रा. रहीमपुरे) मोटारसायकलने जात असताना १५ जुलै २०२२ ला दुपारी साडेतीनच्या सुमारास समोरून येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाने (नाव, गाव माहिती नाही) वाहन भरधाव चालवून अचानक ब्रेक मारल्याने समोरून येणाऱ्या मोटारसायकला धडक दिली.

मोटारसायकलवरील दोघांना दुखापत करून अपघाताची खबर न देता पळून गेला. अपघाताबाबत शुक्रवारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक ठाकरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

Nanded Crime : 21 वर्षीय तरुणीवर घरात घुसून अत्याचार; तोंडात विषारी द्रव पाजून तिला ठार मारण्याचाही केला प्रयत्न

Latest Marathi News Live Update : शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं त्यांचं अभिनंदन- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT