crime news
crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कृषी केंद्रावर छापा; बनावट खते जप्त

सकाळ वृत्तसेवा

धुळे : बेकायदेशीर खतसाठा करून विक्री करणाऱ्या बेहेड (ता. साक्री) येथील कृषी केंद्र संचालकावर कृषी विभागाने कारवाई केली. कारवाईत खतांचा द्रव्यसाठा जप्त केला. विक्रेत्यासह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला. (Agriculture Department taken action against Director of Agricultural Center for illegally stocking selling fertilizers dhule news)

बेहेड येथील धनदाई अ‍ॅग्रो एजन्सीबद्दल संशय बळावल्याने मंगळवारी (ता. ३१) दुपारी कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा विभागीय गुणवत्ता निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी पथकासह एजन्सीवर छापा टाकला.

तेव्हा त्या ठिकाणी अ‍ॅग्रो मित्रा न्यट्रीकेम प्रा. लि. सातपूर (नाशिक) यांनी उत्पादित द्रव्यरूप ६० लिटर खते मिळून आली. या प्रकरणी बोगस खते विक्री केल्यावरून कृषी केंद्राचे संचालक विनोद तोरवणे यांच्यासह अ‍ॅग्रो मित्रा न्यट्रीकेम प्रा. लि. भवानी प्रसाद, सातपूर यांच्यावर विविध कलमांन्वये साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शांताराम मालपुरे, तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे, मोहीम अधिकारी प्रदीप निकम, कृषी अधिकारी अभय कोर, कृषी अधिकारी रमेश नेतनराव, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

Sakal Vastu Expo : स्वप्नातील घर आता सत्यात अवतरणार

Illegal Hoarding : पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

SCROLL FOR NEXT