(Akshaya Tritiya 2023 In Khandesh Akhaji sarees entered the market on the occasion of Akhaji  esakal
उत्तर महाराष्ट्र

Akshaya Tritiya 2023 : बाजारात आखाजी साड्यांची चलती..! व्यावसायिकांनी साधला मुहूर्त..

जगन्नाथ पाटील

Dhule News : ‘एक नूर आदमी दस नूर कपडा’ असे म्हटले जाते. सध्या महिला वर्गामध्ये सतत आणि विविधांगी साड्या घेण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यात गरीब श्रीमंत भेदभाव राहिलेला नाही. (Akshaya Tritiya 2023 In Khandesh Akhaji sarees entered the market on the occasion of Akhaji dhule news)

साडी म्हणजे भारतीय स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी खुणावतेच. यातही दर दोन चार महिन्यांनी नावीन्यपूर्ण साड्या बाजार दाखल होत असतात अन् महिलांना भुरळ पडत असते. सध्या खानदेशात अक्षयतृतीयेचा अर्थात आखाजीचा मुहूर्त साधत बाजारात ‘आखाजी’ साड्या दाखल झाल्या आहेत. खानदेशी महिलांकडून या साड्यांना मागणी वाढली आहे.

खानदेशातील साड्यांच्या दुकानांत आखाजी पॅटर्नला मोठी मागणी वाढली आहे. खानदेशी लेकी आखाजीला माहेरी दाखल होत असतात. आखाजीला खास माहेरची साडी हक्काची असते. व्यापाऱ्यांनीदेखील खास आखाजीवर लक्ष ठेवून आखाजी ब्रॅन्ड वापरून आखाजी पॅटर्नच्या साड्या बाजारात आणल्या आहेत. साऱ्याच महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. या साड्या किमान सहाशेपासून ते सहा हजारांपर्यंतच्या किमतीत आहेत.

लग्नसराईतील साड्या

थ्रीडी बटरफ्लाय, नेट बटरफ्लाय साडी, चिकनी चमेली, लुंगी डान्स, टिश्यू, चिमणी उडाली, पावडर या साड्यांची मागणी वाढली आहे. मराठी व हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यांची नावे देऊन साडी विक्री वाढली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमधील अभिनेत्री वारंवार परिधान करीत असलेल्या साड्यांना त्याच मालिकेचे नाव देऊन साडी व्यवसायास भरभराटी आली आहे. विशेष म्हणजे या साड्या तीनशेपासून ते तीन हजारांपर्यंत उपलब्ध होतात. ऑनलाइन साडी खरेदीतही वाढ झाली आहे.

प्रत्येक राज्यात भुरळ पाडणाऱ्या साड्या

चेन्नई सिल्क (सर्वांत महाग), रेशमी साड्या (प्रांतनिहाय प्रकार), कांजीवरम, पोचमपल्ली, पैठणी, इरकल, बनारसी, टसर सिल्क, युग्गा सिल्क (युग्गा रेशमी किड्यापासून), माहेश्वरी, कालुचेरी (पौराणिक कथांचे चित्रण), काश्मिरी.

"आखाजी साड्यांना वाढती मागणी आहे. प्रत्येक कंपनीनेच हा पॅटर्न बनविला आहे. सर्वसामान्य ते असामान्य असा विचार करून बनविल्या आहेत. किमतीही परवडणाऱ्या आहेत." -धनराज बाविस्कर व प्रीती बाविस्कर, साडी विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना CCTV मध्ये कैद

Crude Oil: तेलाचा दर 2022 इतकाच… तरी भारतासाठी 24% महाग का? आणि दर कमी झाले तरी पेट्रोल का स्वस्त होत नाही?

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

SCROLL FOR NEXT