A bent pillar of nerve to some vehicles on a large bridge. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात मोठ्या पुलावर पुन्हा वाहतुकीची कोंडी; खांब तोडला

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळील पांझरा (Panzara) नदीवरील जुना दगडी पूल (मोठा पूल) हलक्या व कमी उंचीच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता;

परंतु तो रविवारी (ता. २६) मध्यरात्रीनंतर अज्ञात वाहनाने वाकविला आणि तोडलाही. (An old stone bridge over Panzara River was bent broken by an unknown vehicle again causing traffic jams dhule news)

त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. याद्वारे संशयित वाहनाचा शोध घेतला जावा, अशी मागणी आहे. पांझरा नदीवर ब्रिटिशकालीन मोठा पूल आहे. अशा जुन्या दगडी पुलालगत नंतर नवीन समांतर पूल बांधण्यात आला.

असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रॅक्चरल ऑडिटसाठी मोठ्या पुलाचा एक भाग जुना दगडी पूल बंद करण्यात आला होता. त्यामुळे एकाच भागातील म्हणजेच नवीन समांतर पुलावरून दुतर्फा वाहतुकीमुळे कोंडीची समस्या उद्‌भवली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ऑडिट झाल्यानंतर प्रशासकीय अहवालानुसार हलक्या व कमी उंचीच्या वाहनांना जुन्या दगडी पुलावरून वाहतूक करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय देण्यात आला. मात्र, मोठ्या व अवजड वाहनांना पुलावर बंदी करण्यात आली.

अशात रविवारी (ता. २७) मध्यरात्रीनंतर अज्ञात अवजड वाहनाने पुलाच्या ठिकाणी अवजड वाहनांसाठी बंदी दर्शक लोखंडी खांबाला धडक दिली. त्यामुळे तो कोलमडून पडला. परिणामी, मोठ्या पुलाच्या नवीन समांतर पुलावरील दुतर्फा वाहतुकीमुळे दिवसभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT