Inauguration of mining and cleaning work esakal
उत्तर महाराष्ट्र

प्राचीन विहिरींना पुर्नजीवितसाठी लोकसहभाग आवश्यक : डॉ. तुषार रंधे

जगन्नाथ पाटील -सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : बारव विहिरींना पुर्नजीवीत करण्यासाठी जिल्ह्यातील जनेतेने सहभागी झाले पाहिजे. लोकसहभागातून खानदेशातील प्राचीन विहिरींना पुनर्रजीवीत करण्याचे आवाहन जिल्हा परिषद (ZP) अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले. (Ancient wells need public participation for revival Dr Tushar Randhe statement Dhule News)

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग यांच्यासह इतिहासाचे अभ्यासक जाणकार व राज्य बारव विहीर मोहिमेच्या स्वयंसेवकांनी १८८० च्या ब्रिटिश कालीन राजपत्र अभ्यासले. खानदेशात ऐतिहासिक, प्राचीन बारव विहीरी, पाणवठे अस्तित्वात असल्याची नोंद आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राथमिक स्वरुपात धुळे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लळींगच्या पायथ्याशी बारव विहिरीचे खणन आणि स्वच्छतेच्या कामास सुरवात जिल्हा परिषदचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते झाले.

यावेळी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, लळिंगचे माजी सरपंच संभाजी गवळी, ग्रामपंचायत सदस्य बापू साने, आत्माराम सोनवणे, विनोद सावंत, दीपक परदेशी, कैलास परदेशी, चिंतामण गांगुर्डे, विजय पाटोळे, युवराज शिंदे, महादू बोरसे, सुनील पाटोळे, सुरेश सूर्यवंशी, प्रशांत वर्मा, राजेंद्र माळी, ग्रामसेवक बी.एन.पाटील आदी उपस्थित होते. शिवप्रेमींकडून विहिरींची स्वच्छता मोहिम : राम भदाणे धुळे जिल्ह्यात किमान २५० बारव आहेत. जिल्ह्यातील चारही तालुक्यात ६५ विहिरींचे नावे मिळाली आहेत. असून ३१ बारव विहिरींना भेटी दिलेल्या आहेत.

उरलेल्या बारव विहिरींचा स्थानिक पातळीवर शोध घेणे व सद्यःस्थितीची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. प्राथमिक स्वरुपात सुप्रसिद्ध व ऐतिहासिक किल्ले लळिंगच्या पायथ्याशी असलेली प्राचीन काळातील बारव आहे. या बारव विहिरीमध्ये संपूर्ण कचरा भरला गेला होता. शिवप्रेमीनी व जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून सदर विहिरीची साफ-सफाई करण्याची मोहित हाती घेतली असल्याचे जि. प. सदस्य राम भदाणे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT