Anup Agarwal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : टॉवर गार्डनचे रखडलेले काम लवकरच होणार : अनुप अग्रवाल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील पुरातन टॉवर गार्डनचे रखडलेले काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती भाजपचे धुळे शहर विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल यांनी शुक्रवारी (ता. १) दिली. विरोधकांनी खोट्या तक्रारी करून गार्डनच्या नूतनीकरण कामात खोडा घातला. मात्र, चौकशीअंती त्यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले, असा टोलाही श्री. अग्रवाल यांनी लगावला. (Anup Agarwal statement of work on Tower Garden to be completed soon dhule news)

टॉवर गार्डनचे रखडलेले काम मार्गी लावल्याबद्दल श्री. अग्रवाल यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. टॉवर गार्डनच्या नूतनीकरणासाठी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाकडून पाच कोटी मंजूर करून आणले. या कामाला सुरवातही झाली होती.

बांधकाम विभागाच्या माध्यमातून गार्डनचे नूतनीकरण केले जात होते. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता बदलली. महाविकास आघाडी सरकारने या कामाची चौकशी लावली. तसेच कामाला स्थगिती दिली. काही विरोधकांच्या खोट्या तक्रारींवरून काम थांबविले होते. चौकशीअंती सर्व मुद्दे निकाली निघाले.

तथापि, गार्डनच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर श्री. अग्रवाल यांनी हे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. गार्डनचे रखडलेले काम लवकरच सुरू केले जाईल.

तसे पत्र जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागास प्राप्त झाले आहे. त्यामुळे ऐतिहासिक टॉवर गार्डन शहराच्या वैभवात पुन्हा नव्याने भर टाकेल, असा विश्वासही श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT