marriage esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शुभमंगल सामुदायिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत शुभमंगल सामुदायिक, नोंदणीकृत विवाह योजना जिल्ह्यातील खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहासाठी राबविण्यात येत आहे. (Appeal to take advantage of Shubh Mangal Community Marriage Scheme by govt dhule news)

पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी केले. शुभमंगल सामुदायिक विवाह योजना जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येते. विवाह करणाऱ्या जोडप्यास दहा हजार रुपये व सामुदायिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस एका जोडप्यामागे दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते.

संस्थेस योजना राबविताना किमान पाच व कमाल शंभर जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी आहे. संस्थेस वर्षातून दोनदाच सामुदायिक विवाह समारंभ आयोजित करता येतील. स्वयंसेवी संस्थेने पात्र लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकत्रित करून विवाह सोहळ्याच्या किमान एक महिन्याअगोदर सादर करणे आवश्यक राहील. तसेच विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बधनकारक राहील.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

संपर्कासाठी आवाहन

नोंदणीकृत विवाह योजनेमध्ये नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांना या योजनेद्वारा दहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल. ज्या जोडप्यांना फक्त नोंदणीकृत विवाह करावयाचा आहे, त्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात सामील होणे बंधनकारक नाही. शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजनेसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीमार्फत दर वर्षी निधी मंजूर केला जातो.

त्यामुळे ज्या नोंदणीकृत संस्था शुभमंगल सामुदायिक विवाह योजना राबविण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटल, देवपूर, धुळे येथे संपर्क साधावा, तसेच विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT