school sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करा; सहाय्यक जिल्हाधिकार्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदांतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात शहरातील इंग्रजी नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी ७ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. (Apply for admission to an English medium residential school Appeal by Assistant Collector nandurbar news)

प्रवेश अर्ज २२ जून २०२३ पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा, जि. नंदुरबार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, तळोदा, गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, पंचायत समिती, अक्कलकुवा तसेच गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, पंचायत समिती, धडगाव येथे सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामूल्य मिळतील. परिपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज शासकीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा (जि. नंदुरबार) येथे स्वीकारण्यात येतील. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडिलांच्या मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी. पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे. (सोबत २०२२-२३ वर्षाचा उत्पन्न दाखला जोडावा.)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय सेवेत नसल्याबाबत हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला, विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे.

अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवक, पालिका यांचा दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडिलांचे व आईच्या आधारकार्डची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी-शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्रांची अपूर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. प्रवेशाबाबतच्या अटी व शर्ती प्रवेश अर्जात नमूद असून, प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून ७ जुलै २०२३ ला जमा करावेत. प्रवेशासाग्राठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पत्की यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT