pathology lab esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मनपाच्या जुन्या इमारतीत पॅथॉलॉजी लॅब; मनपा स्थायी समितीची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या जुन्या इमारतीत पॅथॉलॉजी लॅबसाठी कृष्णा डायग्नोसिस (पुणे) यांना भाडेतत्त्वावर वाढीव जागा देणे, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेंतर्गत जॅकवेलजवळ प्लॅटफॉर्म तयार करणे व आनुषंगिक कामांसह इतर विविध विषय स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले. (Approval of Municipal Standing Committee to lease space for Pathology Lab in old municipal building dhule news)

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा सकाळी महापालिका सभागृहात झाली. या सभेत अजेंड्यावरील विविध विषयांना तत्काळ मंजुरी देण्यात आली. यात महापालिकेच्या जुन्या इमारतीतील आयुर्वेदिक दवाखान्यालगतची मोकळी जागा व उत्तरेकडील जुने आस्थापना कार्यालयापासून जिन्यापर्यंतच्या पाच खोल्या तसेच जुने लेखा कार्यालयाची जागा पॅथॉलॉजी लॅबसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा विषय होता.

हा विषय मंजूर करण्यात आला. हे काम नागरिकांसाठी चांगले असल्याने विषय मंजूर करा, मात्र या विषयावर प्रेझेंटेशन सादर करण्याची मागणी सदस्य हर्षकुमार रेलन यांनी केली. याशिवाय अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेंतर्गत ट्रान्स्फॉर्मर ठेवण्यासाठी जॅकवेलजवळ प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आवश्‍यक बांधकाम करणे व आनुषंगिक कामे करण्यासाठी प्राप्त निविदांबाबत स्थायीपुढे विषय होता. एकूण एक कोटी ४६ लाख ६४ हजार ८८० रुपये खर्चाचे हे काम आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासाठी गायत्री कन्स्ट्रक्शनने अंदाजपत्रकीय दराने निविदा भरली होती. त्यामुळे त्यांना हे काम देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये सर्व्हे क्रमांक ४४९ आविष्कारनगरमधील शासकीय मोकळ्या जागेला संरक्षक भिंत बांधण्याबाबत निविदा दर मागविण्यात आले होते.

या कामासाठी एकूण ४९ लाख ९५ हजार ३२४ रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी होती. या कामासाठी यासीन अब्दुल रज्जाक शेख यांची सर्वांत कमी अंदाजपत्रकीय दराने निविदा प्राप्त होती. त्यांना हे काम देण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ८ मध्ये दोन ठिकाणी तातडीने बेअरिंगची कामे झाली. यासाठी एक लाख ५९ हजार ४९८ रुपये खर्च झाला. या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर! पीएसआय पदासाठी वयोमर्यादा गणनेची अट; एक संधी देण्याची मागणी

Budh Mahadasha: तब्बल 17 वर्षांची बुध महादशा! ‘या’ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

PMC Election: पुण्यात भाजप कुणाला उमेदवारी देणार? निष्ठावंतं की नेत्यांच्या मर्जीतील? मुंबईत वर्षा बंगल्यावरील बैठकीची Inside Story

Kolhapur : आजऱ्यात मध्यरात्री अग्नितांडव, ७ चारचाकी गाड्यांसह दुकानं जळून खाक; कोट्यवधींचे नुकसान

अजितदादा गेले कुठं? दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटल्यानंतर पोलीस ताफा न घेता एकटेच निघाले

SCROLL FOR NEXT