road transport problems
road transport problems esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News |खेळ बंद करून प्रश्‍न सोडवावा : ललित माळी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील देवपूरमधून जाणारा जुना आग्रा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यक्षेत्रात आहे. या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी या विभागाची आहे. तरीही हा विभाग हात वर करतो. (Assembly organizer of Shiv Sena Lalit Mali statement about road problems dhule news)

असे असताना या विभागाच्या रस्त्यावर अधिकार नाही, असे सांगत हात वर करणाऱ्या महापालिकेकडून दुतर्फा अतिक्रमणधारकांकडून रोज पंधरा रुपये बाजारशुल्क वसुली होते कशी? या गंभीर स्थितीत वाहतुकीची समस्या जिवावर उठत असेल तर वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेचे अधिकार काय, असा प्रश्‍न उपस्थित करत शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागण्यांचे निवेदन दिले.

श्री. माळी यांनी सांगितले, की देवपूरमधील वाढते रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण, त्यामुळे वाहतुकीची जिवावर उठलेली समस्या दिसत असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलिस नियंत्रण शाखा हे एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करत देवपूरवासीयांचा जीव धोक्यात घालत आहेत.

त्यांनी हा खेळ बंद करून समस्या मार्गी लावाव्यात. संबंधित समस्यांमुळे देवपूरवासीय त्रस्त झाले असून, हा प्रश्‍न दिल्ली, राज्यात, महापालिकेत भाजपची सत्ता असूनही सत्ताधारी नगरसेवक हाताळत नसल्याने त्यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

अधिकारी वर्ग ढिम्म

अनेक वर्षांपासून देवपूरमधील हमरस्त्यावरील वाढती अतिक्रमणे, वाहतुकीची जटिल होत चाललेली समस्या ढिम्म अधिकारी वर्गामुळे अधिक जटिल व गंभीर होत चालली आहे. सरासरी अडीच लाख लोकसंख्येच्या देवपूरसाठी महापालिकेने अद्याप भाजी मार्केटसाठी जागेचे आरक्षण ठेवलेले नाही.

वेळोवेळी हॉकर्सचे प्रश्‍न सुटण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा महापालिकेकडून अवमान केला जात आहे. एसएनडीटी महाविद्यालयासमोर आणि देवरे हॉस्पिटलजवळ महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भाजी बाजार भरत होता. तेथून त्यांना हुसकाविण्यात आले.

ते असंख्य भाजी विक्रेते अतिक्रमणाद्वारे जुना आग्रा रोडवर दुतर्फा स्थायिक झाले आहेत. जीटीपी स्टॉप ते नेहरू चौकापर्यंत बेडरपणे दुतर्फा रस्ते व्यापत अतिक्रमणधारकांनी वाहतुकीची समस्या निर्माण केली आहे. तरीही अधिकारी वर्ग ढिम्म कसा? ते निष्पापाचा बळी गेल्यावर जागे होणार आहेत का, असा देवपूरवासीयांचा प्रश्‍न आहे.

जागा उपलब्ध करावी

या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील अनधिकृत विक्रेते, हॉकर्सला देवपूरमध्ये कायमची महापालिका किंवा शासनामार्फत जागा उपलब्ध करून द्यावी आणि संबंधित समस्यांचे निराकरण करावे. रस्त्यावरील अतिक्रमणांपुढे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर होते.

त्यामुळे एसटी, रुग्णवाहिका, अवजड वाहनांना वाहतूक करणे धोक्याचे होते. यात महिला, प्रौढ व इतर प्रवाशांना वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढणे भीतीचे वाटते. या स्थितीत देवपूरसाठी संबंधित अधिकारी वर्गाने तत्काळ पावले उचलावीत आणि समस्या नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी असल्याचे श्री. माळी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT