Amrishbhai Patel  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Riot News : राजकीय ईर्षेतून आमदारांवर हल्ला; आमदार अमरिशभाई पटेल यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Dhule Riot News : तालुक्यातील युवकांची माथी भडकावून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करीत आहेत. किरकोळ वादाला दंगलीचे स्वरुप देऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र रचण्यात आले.

आमदार काशीराम पावरा यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे सुनियोजित कट आहे. त्यातून ते सुदैवाने बचावले. राजकीय ईर्षेपोटीच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप आमदार अमरीशभाई पटेल यांनी केला. (Attack on MLAs out of political jealousy Allegations of MLA Amrishbhai Patel dhule riots news)

सांगवी (ता. शिरपूर) येथे बॅनर फाडल्याच्या कारणावरुन गुरुवारी (ता. १०) झालेल्या दंगलीत आमदार पावरा यांच्या वाहनाची संपूर्ण मोडतोड करण्यात आली. त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यातून ते बालंबाल बचावले. या घटनेनंतर आमदार पटेल यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, हा प्रकार एकाच दिवसात किंवा अचानक घडलेला नाही. तालुक्यातील सलोख्याचे वातावरण अस्थिर कसे होईल या दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. तालुक्यातील समस्यांचे खोटेनाटे चित्र उभे करुन बदनामी करण्याचे प्रकार यापूर्वी घडवण्यात आले.

लोकप्रतिनिधींना शिविगाळ

मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चाला अनिष्ट वळण देऊन लोकप्रतिनिधींना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येत नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिन गावपातळीवरच शांततेत साजरा केला.

त्यामुळे शक्तीप्रदर्शनाची संधी हुकल्याने संतप्त झालेल्या असामाजिक तत्त्वांनी सांगवी येथील घटनेचे निमित्त साधून दंगलीचे षडयंत्र रचले. त्यात आमदार पावरा यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही आमदार पटेल यांनी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सलोख्याची परंपरा जपावी

तालुक्याला जातीय, सामाजिक व धार्मिक सलोख्याची परंपरा आहे. आमदार पावरा यांनी तीन पंचवार्षिकपासून ती यशस्वीपणे जपली. प्रामाणिक व जनहिताची कळकळ असलेल्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश होतो.

मात्र, समाजकंटकांना असा लोकप्रतिनिधी व त्याच्या कार्यामुळे होणारा विकास रुचत नाही. जनतेने अशा लोकांपासून सावध राहावे, कोणीही कोणत्याही अफवांना बळी न पडता शिरपूर तालुक्याची शांततेची परंपरा कायम राखण्याचे आवाहन आमदार पटेल यांनी केले.

युवकांच्या भवितव्याशी खेळ

दंगलीदरम्यान युवकांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून चुकीचे कार्य करुन घेण्यात आल्याचे दिसते. आता या युवकांच्या भविष्यावर जो काही वाईट परिणाम होईल, त्याची जबाबदारी ते समाजकंटक घेतली का? आपण चांगले करु शकत नाहीत, तर किमान युवकांचे वाईट तरी करु नका. गावपातळीवर शांतता राखा, विकास कामे करा.

त्यासाठी जी काही मदत लागेल ती नि:संकोच मागा. आम्ही सदैव सहकार्यासाठी तत्पर आहोत. शिक्षणाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास होईल हे लक्षात ठेवा. युवकांच्या भवितव्याशी खेळू नका, असे आवाहन आमदार पटेल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT