City Transport Branch participating in helmet awareness rally under road safety campaign,
City Transport Branch participating in helmet awareness rally under road safety campaign, esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात हेल्मेट वापराविषयी जनजागृती; वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभागातर्फे उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागातर्फे धुळे शहरात हेल्मेट वापराविषयी जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान रस्तासुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाकडून १८ जानेवारीला सकाळी दहा ते साडेअकरादरम्यान धुळ्यात हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. (Awareness about helmet use in dhule news)

रॅलीत मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या कार व इतर वाहनांनीदेखील सहभाग नोंदविला. शहरातील संतोषीमाता चौकात पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखविला.

तेथून ही रॅली धुळे महापालिका-देवपूर (जयहिंद चौक)-टॉवर बगीचा-बारा पत्थर-फाशीपूल-दसेरा मैदान-कोरकेनगरमार्गे चाळीसगाव चौफुली अशी काढण्यात आली.

या रॅलीचा चाळीसगाव चौफुली येथे समारोप झाला. रॅलीतील वाहनचालकांनी वाहनांवर जनजागृतीपर संदेश लिहिलेले स्टिकर्स चिकटवले होते.

हेल्मेट वापराचे महत्त्व रॅलीतून पटवून देण्यात आले. प्रबोधनात्मक घोषणा देऊन हेल्मेट वापराचे आवाहन केले.

एआरटीओ चारुदत्त व्यवहारे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते, संदीप ठाकरे, सुनील इनमुलवार, हेमंत सोनार, फारूक शेख, विनोद हिरे, मुकेश माळी, रवींद्र शिंदे, हृषीकेश कुंगर, श्रद्धा पगार, मोर्या युनियनचे अध्यक्ष मिलिंद बैसाणे.

सुनील चौधरी, शरद गोसावी, सुकेशनी बैसाणे, राजरत्न बैसाणे, श्री. राजपूत, श्री. बेडसे, श्री. सातपुते, श्री. दांडगे, श्री. मोरे, श्री. पांडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी रॅलीत सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT