A pair of bullocks for sale in the market on the eve of the hive. esalal
उत्तर महाराष्ट्र

Bail Pola 2022 : पोळ्यामुळे बाजारपेठ सजली; खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ माती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोड्या, तसेच साजशृंगार साहित्याने सजली आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २५) खरेदीसाठी गर्दी केली. (Bail Pola 2022 market established dhule latest marathi news)

यंदा बैलजोडीसह साहित्याच्या दरात दहा ते २० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पोळा सण साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. जिल्ह्यात पाऊसही चांगला झाला आहे. त्यामुळे पोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

बाजारपेठेत माती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोड्या विक्रीसाठी दाखल आहेत. शहरात प्रमुख चौकांसह ठिकठिकाणी बैलजोड्या विक्रीचे स्टॉल लागले आहेत. यंदा मातीची बैलजोडी ३० रुपयांपासून शंभर रुपयापर्यंत, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोडीचा दर ५० रुपयांपासून पाचशे, हजार रुपयापर्यंत आहे. बैलजोड्या सजविण्यासाठी घुंगरमाळ, वेसन, शिंगदोरी, मोरखी, केसरी, कासरा, कवड्याची दृष्टमाळ, पैंजण, शेंबी व गोंडा विक्रीस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT