Farmer Waiting For Rain
Farmer Waiting For Rain esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बळीराजाच्या नजरा लागल्या आकाशाकडे, Monsoonच्या आगमनाची प्रतीक्षा

योगीराज ईशी

Nandurbar News : या वर्षी हवामानतज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी वेळीच शेताची खरिपपूर्व मशागत करून शेती मशागती साठी सज्ज केली आहे.

पेहरणी साठी लागणारे बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची दुकानात गर्दी दिसून येत असून, पाऊस झाल्यावरच पेरणी होणार आहे; परंतु आज जून महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप वातावरणात पावसाचे संकेत दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता मात्र आकाशाकडे लागल्या आहेत. (Baliraja looked up at sky waiting for arrival of Monsoon Congestion at fertilizer-seed shop Nandurbar News)

या वर्षी मॉन्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच मशागतीची कामे वेळेवर आटोपली. वेळेवर पाऊस झाला तर पेरण्या वेळेवर होऊन उत्पादनवाढची अपेक्षा असते.

त्यामुळे यंदा अतिशय कडक उन्हाळा असतानाही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण केली. नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणे, शेणखत टाकणे आदी कामे पूर्णत्वास नेली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कमी वेळात मशागतीची कामे व्हावीत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने शेतीकामे करण्यास प्राधान्य दिले आहे. अजूनही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या सहाय्याने मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देतात. अशा विविध पद्धतीने मशागतीची कामे केल्यानंतर, कर्ज घेऊन लागणारे बियाणे, खतखरेदी सुरू आहे.

मात्र तज्ज्ञांचा अंदाज चुकल्याने अर्धा जून आला, कडक ऊन व वातावरणात उकाडा कायम असल्याने पावसाची चिन्हे दिसत नसल्याने वेळेवर पेरणी होईल का, या विचाराने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आकाशात तुरळक ढग भरून येतात. दिवसभर प्रचंड उकाडा होऊन सायंकाळी पुन्हा वातावरणात गारठा निर्माण होत आहे.

जुन्या जमान्यात ग्रामीण भागात शेतकरी पक्षाच्या घरटी बांधण्यावरून पावसाचा अंदाज वर्तवीत असे, मात्र असे काहीही संकेत दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात काही क्षेत्र बागायत वगळता बहुतांश भाग पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

कपाशी लागवडीवर परिणाम

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली; परंतु मागील महिन्यापासून सतत वीज खंडित होऊन, विजेचा लपंडाव सुरू आहे.

पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT