bus depot esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दोंडाईचा आगाराची सर्वोत्कृष्ट कामगिरी; राज्यातील परिवहन महामंडळाच्या 250 आगारांत प्रथम

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा येथील परिवहन महामंडळाच्या आगाराचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला असून, महाराष्ट्रातील २५० आगारांच्या उत्पन्न खर्च बाबींची मध्यवर्ती कार्यालयामार्फत दरमहा आकडेवारी घेतली जाते.

त्यानुसार सप्टेंबर २०२३ च्या गुणांकनानुसार दोंडाईचा आगाराचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला. (Best performance of Dondaicha bus depot in maharashtra dhule news)

एकूण ९१ गुणांसह आपण प्रथम क्रमांक मिळविला आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या नियमानुसार ज्या ६० पेक्षा जास्त बस असतील ते ‘अ’ श्रेणीत, ४५ ते ६० बस असतील ते आगार ‘ब’ श्रेणीत येते. त्यानुसार दोंडाईचा आगार ‘ब’ श्रेणीत येत असून, ‘ब’ श्रेणीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्याने अधिकारी वर्गाचे नियोजन व सर्वांनी घेतलेली कष्ट यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या एक वर्षापासून आगारप्रमुख किशोर पाटील काम पाहत असून, त्यांच्या कामाची आखणी, उत्कृष्ट नियोजन व कर्मचारी वर्गाशी असलेली बांधिलकी, काम करण्याची पद्धत यामुळे अगाराचा आलेख उंचावत आहे.

दोंडाईचा आगार ब श्रेणीमध्ये येत असून, ९१ मार्क मिळवून राज्यात प्रथम आले आहे याचा सर्वत्र आनंद असून यापुढे आम्ही अजून जोमाने काम करण्याचा मानस व्यक्त केला जात आहे.

दोंडाईचा आगाराची स्थिती

-दररोज १८ हजार किलोमीटर चालविले जातात

-सप्टेंबर महिन्यांचा नफा- २५ लाख

-एका किलोमीटरसाठी ४.८८ रुपये नफा

''महाराष्ट्रात दोंडाईचा आगराचा प्रथम क्रमांक हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने आला असून, त्याचे श्रेय सर्व कर्मचाऱ्यांचे आहे. सर्वांच्या मेहनतीने शक्य झाले याचा आनंद आहे.''-किशोर पाटील, आगारप्रमुख, दोंडाईचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT