queue of followers to greet the Landor bungalow. followers saluting the statue of Babasaheb Ambedkar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : 2 वर्षांनी भीमस्मृती यात्रेला गर्दी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोनातील दोन वर्षांच्या खंडानंतर मुंबई- आग्रा महामार्गावरील लळिंग (ता. धुळे) कुरणातील ऐतिहासिक लांडोर बंगला येथे रविवारी (ता. ३१) आंबेडकरी अनुयायींचा जनसागर लोटला. भीमस्मृती यात्रेनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. (Bhima Smriti Yatra Crowd After 2 Years dhule Latest Marathi News)

न्यायालयीन कामकाजानिमित्त येथे आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३८ मध्ये लांडोर बंगल्यास भेट दिली होती. त्यांच्या या आठवणींना उजाळा देण्यासाठी २९ वर्षांपासून लांडोर बंगलास्थळी दरवर्षी ३१ जुलैला भीमस्मृती यात्रा भरते.

दोन वर्षे कोरोनाचा काळ सोडला तर ही यात्रा नियमित होत होती. यंदाही रविवारी भीमस्मृती यात्रा भरली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३१ जुलै १९३८ मध्ये न्यायालयीन कामकाजासाठी शहरात आले होते.

त्या वेळी त्यांनी लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता. त्यांची आठवण स्मरणात राहावी, यासाठी माजी प्राचार्य स्व. जे. जी. खैरनार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भीमस्मृती यात्रा भरविण्यास सुरवात केली. हा उपक्रम अखंडित सुरू आहे.

रॅलीत आमदार सहभागी

आंबेडकरी चळवळीचे हजारो कार्यकर्ते, महिला अनुयायांनी लांडोर बंगल्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले. आमदार फारुक शाह यांनी आंबेडकरी नेत्यांसह मोटारसायकल रॅलीने लांडोर बंगला गाठत डॉ. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले.

आंबेडकरी नेते वाल्मीक दामोदर, ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, प्रेमानंद अहिरे, आबा खंडारे, राजू शिरसाट, प्रभाकर जाधव, आनंद सैंदाणे, मणीबाबा खैरनार, आनंद लोंढे, आसिफ शहा, निजाम सय्यद, अफसर शाह, संजय बैसाणे, राहुल खैरनार आदी उपस्थित होते. यात्रोत्सवानिमित्त भीमगीतांसह अन्य कार्यक्रम झाले. अनेकांनी कुटुंबासह हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभे राहिले अन्‌ तिघांच्या आयुष्य क्षणात संपले... एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Astronomical Events 2026: नववर्षात ४ सुपरमून, २ ब्लूमून व १२ उल्कावर्षाव; देशवासीयांना विविध खगोलीय घटनांची मिळणार पर्वणी

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT