Nandurbar: Mayor Ratna Raghuvanshi and women corporators during the groundbreaking ceremony of development works in the city. In the second photo, former MLA Chandrakant Raghuvanshi on the occasion of Bhoomi Pujan. Neighbors Mayor Ratna Raghuvanshi, Deputy Mayor Kunal Vasave, Hiralal Chaudhary etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शहरात 48 तासात 26 विकास कामांचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व पदाधिकाऱ्यांची मुदत शनिवारी (ता.२४) संपत असल्याने पालिकेतील मंजूर विकास कामांचे दिवस-रात्र एक करून भूमिपूजन करण्यात येत आहे.

शहरात दोन दिवसात २६ विकास कामांचे भूमिपूजन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२३) करण्यात आले आहे. उर्वरित विकास कामांचे शनिवारी (ता.२४) भूमिपूजन करण्यात येणार आहे. (नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व पदाधिकाऱ्यांची मुदत शनिवारी (Bhoomipujan of 26 development works in the city in 48 hours Nandurbar News)

नंदुरबार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व नगरसेवकांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यकाळ २४ डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर प्रशासक नियुक्त होणार आहे. नगरपरिषदेतर्फे मंजूर विकासकामांचे भूमिपूजन सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत करण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभापती राकेश हासानी, नगरसेवक परवेज खान, नगरसेवक रवींद्र पवार, जगन्नाथ माळी, नगरसेविका भारती राजपूत, ज्योती राजपूत, मनीषा वळवी, सोनिया राजपूत, फारुख मेमन, रियाज कुरेशी, चेतन वळवी, मोहितसिंग राजपूत, अतुल पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

या कामांचे भूमिपूजन

कामनाथ महादेव मंदिरालगत काँक्रिटीकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र. १९ मध्ये मिलिंद माळी यांचे घरापासून पूर्वेस अंकुश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, सरस्वतीनगर मधील सभामंडप, धुळे रोड वरील नेहा पार्कपासून ते मेननालापर्यंत ड्रेनेज लाइन टाकणे, रुखमाई नगर खुल्या जागेत, राम नगर मधील खुल्या जागेत, गवळीवाडा परिसरात रमण चौधरी यांच्या घराच्या पश्चिम बाजूस, परदेशीपुरामध्ये सभामंडप करणे. इमामबादशाह पाण्याची टाकी करणे, बीफ मार्केटलगत असलेल्या सामाजिक सभागृहाजवळ चेंजिंग रूम तसेच, लोखंडी जिना बसवणे, कसाईवाडा चौकातील बिलाल कुरेशी यांचे घर ते रशीद अब्बास कुरेशी यांचे घरापर्यंत काँक्रिट, गटारलाइन टाकणे, कसाईवाडा चौकातील पारू पहेलवान यांचे घर ते मेहबूब कुरेशी यांचे घरापर्यंत काँक्रिट, गटार लाइन टाकणे, अग्निशमन केंद्राच्यामागील बाजूस कंपाउंड मध्ये सभामंडप करणे, शिरीषकुमार नगरात सभा मंडप करणे, जयचंद मधील खुल्या जागेत नगर सभामंडपाचे बांधकाम, लक्ष्मी नगरमधील खुल्या सभामंडपाचे बांधकाम, बादशाह नगर मधील आरिफ शेख यांचे घरापासून ते मेन नाला पर्यंत पाइप गटार लाइन टाकणे, प्रशांतनगर मधील खुल्या सभामंडपाचे भूमीपूजन आदी कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT