Dhule municipal corporation news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप नगरसेवक लोणावळा टूरवर!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक पुन्हा एकदा पर्यटनाला जात असल्याची चर्चा मंगळवार (ता. ३१)पासून सुरू झाली. बुधवारी (ता. १) या चर्चेला उधाण आले. गुरुवार (ता. २)पासून हे नगरसेवक लोणावळा टूरवर जात असल्याचे समजते. (BJP corporator of Lonavala tour in background of mayoral election dhule news)

महापौर निवडणुकीपर्यंत त्यांचा हा टूर असणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडे निर्विवाद बहुमत असताना व नगरसेवक फुटण्याची शक्यता नसताना भाजपला वारंवार अशी कसरत का करावी लागते हा प्रश्न आहे.

धुळे महापालिकेच्या उर्वरित कालावधीसाठी महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार ३ व ४ फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्र प्राप्त करणे, दाखल करण्याची प्रक्रिया होईल तर ८ फेब्रुवारीला निवड होईल.

महापौरपदाबरोबरच स्थायी समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापतिपदासाठीही याच कालावधीत ही प्रक्रिया होईल. दरम्यान, महापौरपदासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. उर्वरित आठ महिन्यांचा कालावधी का असेना पण पदासाठी इच्छुक वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

एकीकडे इच्छुकांकडून पक्षाच्या स्थानिक ते वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असताना आता भाजपचे सर्व नगरसेवकांना पर्यटनावर घेऊन जाण्याचे प्लॅनिंग समोर आले. मंगळवारपासूनच भाजपचे सर्व नगरसेवक टूरवर जात असल्याची चर्चा सुरू झाली. बुधवारी या चर्चेने अधिकच जोर धरला. प्रारंभी या नगरसेवकांना गोव्याला नेले जात असल्याची चर्चा होती. गुरुवारी मात्र लोणावळा फायनल झाल्याचे समजते.

कसरत कशासाठी?

सत्तेसाठी लोकप्रतिनिधींच्या पळवापळवीचा खेळ होतो. बहुमत असलेल्या पक्षालाही आपल्या सदस्यांना एकत्र ठेवण्याची कसरत करावी लागते. मात्र, विरोधकाची बाजूही तेवढी सक्षम असेल तर असा खेळ पाहायला मिळतो. धुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपकडे ७४ पैकी तब्बल ५० नगरसेवकांचे निर्विवाद संख्याबळ आहे.

त्यामुळे विरोधी पक्ष कमकुवत आहेत. शिवाय या कमकुवत असलेल्या विरोधकांमध्ये एकसंधता, एकवाक्यता दिसत नाही. महापालिकेतील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात मजबुतीने लढतानाही कधी दिसले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना विरोधी पक्ष आपल्याकडे खेचण्याची, नगरसेवक फुटण्याची शक्यता दिसत नाही.

अशी सर्व परिस्थिती असताना सत्ताधारी भाजपला आपल्या ५० नगरसेवकांना टूरवर घेऊन जाण्याची कसरत का करावी लागत आहे हे मात्र कोडे आहे. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांना यातून काही संदेश देण्याची शक्यता मात्र यात दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT