Blind Nilesh Dhangar sets out for Narmada Parikrama with him Yogesh Chavan, Sunil Marathe  esakal
उत्तर महाराष्ट्र

Inspirational News : दृष्टिहीन नीलेश धनगर निघाले नर्मदा परिक्रमेला! दुर्दम्य इच्छाशक्तीचे उदाहरण..

सम्राट महाजन

तळोदा (जि. नंदुरबार) : दुर्दम्य इच्छाशक्ती व मानसिक कणखरपणा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होऊ शकतात आणि अशीच एक असाध्य गोष्ट साध्य करण्याच्या मार्गावर एक तरुण आहे. (Blind youth from Madhya Pradesh set out alone to complete Narmada Parikrama nandurbar news)

मध्य प्रदेशातील चक्क दृष्टिहीन (Blind) युवक नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एकटेच निघाले आहेत. दृष्टिहीन असूनदेखील नीलेश धनगर पदयात्रेने नर्मदा परिक्रमेला निघाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, गावोगावी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

नर्मदा परिक्रमा करून नदीकिनाऱ्यावरील तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने मानवाला पुण्य मिळते, अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. त्यामुळे अनेक साधू, संत, भक्त धार्मिक आस्था मनात घेऊन नर्मदा परिक्रमेसाठी जात असतात.

दरम्यान, परिक्रमा करणारे काही भाविक ही परिक्रमा पायी पूर्ण करतात, तर काही भाविक मात्र ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लोटांगण घालत किंवा वेगवेगळा मार्ग निवडतात. मध्य प्रदेशातील इंदूर येथील नीलेश धनगर (वय २९) हा तरुण चक्क दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असला, तरी अध्यात्मावर विश्वास असल्याने २ जानेवारीपासून नर्मदेच्या परिक्रमेसाठी निघाला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील बुदनी या गावापासून तो नर्मदा परिक्रमेसाठी निघाला आहे. परिक्रमेचे अंतर शंभर-दीडशे नव्हे तर तब्बल सोळाशे किलोमीटर आहे. पण त्याने अंतराचा विचार न करता फक्त एका काठीचा आधार घेत परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ठिकठिकाणी भाविक मदत करीत आहेत.

बुधवारी (ता. २९) सकाळी तळोदा शहरात त्याचे आगमन झाले. येथील समाजसेवक योगेश चव्हाण, सुनील मराठे, चंदू जैन हे त्याच्यासोबत कुकरमुंडा फाट्यापर्यंत पायी गेले. तेथून पुढे भावेश माळी अक्कलकुव्यापर्यंत त्याच्यासोबत गेले.

दरम्यान, नीलेश धनगर वाटेत रात्री एखाद्या मंदिरात मुक्काम करीत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच्या परिक्रमेला सुरवात करतात. दररोज साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटरचा प्रवास करत असल्याने त्यांना अजून परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जवळपास पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सॲप, फेसबुकही हाताळतात

नीलेश धनगर यांनी राज्यशास्त्र विषयात ब्रेल लिपीत पदवी प्राप्त केली असून, संगणक विषयात डिप्लोमा केला आहे. ते दोन्ही डोळ्यांनी अंध असले तरी कॉम्प्युटर, अँड्रॉइड मोबाईल सहज हाताळतात. तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक आदी समाज माध्यमापासून फोनपेच्या रिचार्जपर्यंत सर्व गोष्टी करतात. टॉकिंग सॉफ्टवेअरच्या सहाय्याने सर्व हाताळतात.

"कोणत्याही क्षेत्रात आपले स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर दृढनिश्चय, आत्मविश्वास आवश्यक आहे. बालपणापासून नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती. त्यामुळे दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असलो अन् सोळाशे किलोमीटरचे अंतर असले तरी नर्मदा परिक्रमेच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करीत, ही यात्रा पूर्ण करणारच.' -नीलेश धनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT