Borad velawad road is in Bad condition nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 5 वेळा भूमिपूजन तरी रस्ता ‘जैसे थे’; बोरद-वेळावद रस्त्याची दुरवस्था!

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यातील बोद ते वेळावद या चार किलोमीटर रस्त्याचे गेल्या ११ वर्षांत तब्बल पाच वेळा भूमिपूजन झाले आहे. मात्र आजपर्यंत कामाला प्रत्यक्षात सुरवात झालेली नाही. चांगल्या रस्त्याअभावी एसटीचा फेऱ्यादेखील बंद आहेत.

त्यामुळे बोरद-वेळावद रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (Borad velawad road is in Bad condition nandurbar news)

तळोदा तालुक्यातील बोरद हे सर्वांत मोठे गाव असून, या ठिकाणी परिसरातील असंख्य गाव-पाड्यांमधील नागरिक आपापल्या कामानिमित्त येतात. दरम्यान, बोरद ते वेळावद या चार किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून कुढावद, जावदा, वाडी पुनर्वसन, वेळावद व तुळाजा आदी गावांतील नागरिकांची नेहमी वर्दळ असते.

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी या रस्त्याने जावे लागते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पावसाळ्यात तर शेतमालक व शेतमजूर यांना शेतात जाणे मुश्कील होते. शेतातील केळी, पपई आदी मालाची वाहतूक करताना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत.

तसेच या रस्त्यावरील नाल्यास पावसाळ्यात पूर येतो. पुरासोबत गाळ वाहून येत असल्याने चार महिने हा रस्ता बंदच असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिणामी नागरिकांना कलमाडीमार्गे दहा किलोमीटर फेऱ्याने जास्त अंतर कापून बोरद येथे यावे लागते. गावातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी कलमाडीमार्गे बोरद येथे जावे लागते.

दरम्यान, रस्त्याअभावी तळोदा ते वेळावद एसटी बससेवादेखील बंद आहे. परिसरातील नागरिकांनी आमदार राजेश पाडवी यांच्याकडे या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच रस्ता मंजूर होऊन भूमिपूजन केले जाते मग प्रत्यक्षात कामाला सुरवात का होत नाही, असा गहन प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.

तसेच निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतात, रस्त्याचे भूमिपूजन करतात व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत वेळ निभावून नेतात. त्यामुळे आतातरी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे, असे अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT