नंदुरबार- उच्छल मार्गावरील धानोरा गावाचा रंका नदीवरील कोसळलेला पूल esakal
उत्तर महाराष्ट्र

Bridge Collapse : नंदुरबार- सुरत मार्गावरील रंका नदीवरचा पूल कोसळला

विजय वळवी

धानोरा : नंदुरबार -सुरत मार्ग क्रमांक सहावरील धानोरा गावाजवळील रंका नदीवरील पूल आज (ता.२९) सकाळी नऊच्या सुमारास अचानक कोसळल्याने हा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान, कोणतेही वाहन या पुलावरून मार्गक्रमण करत नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.(Bridge over Ranka river on Nandurbar Surat road collapses dhule latest news)

बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. सुमारे ४५ वर्ष जुना हा पूल होता. पूल अचानक कोसळला असला तरी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट बाबतची माहिती देण्यासही संबंधित विभाग असमर्थ आहे. त्यामुळे बांधकाम विभागाचा कार्यप्रणालीवरच येथील नागरिकांनी आरोप केले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या उच्छलमार्गे सुरत राज्यमार्ग सहा वरील धानोरा गावाजवळ असलेल्या रंका नदीवरील बांधण्यात आलेला पूल आज सकाळी कोसळला. पुलावर वाहने नसल्याने मोठी दुर्घटना घटना टळली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार १९८२ चा सुमारास हा पूल बांधण्यात आला होता. त्यानुसार सुमारे मात्र ४४-४५ वर्षाचे बांधकाम झाले आहे.

या पुलावरील कठडे व काही ठिकाणी तूट फूट झाली होती. पुलाचा स्लॅब कोसळेल असे कुठेही दिसत नव्हते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते.? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. गुजरातला जोडणारा हाही एक महत्त्वपूर्ण मार्ग असल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच असते. पुलाची क्षमता व वाहने वाहतुकीची क्षमता याचा कधीही विचार केला गेलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावित, सरपंच मनोज पाडवी, पंचायत समिती सदस्या अंजना वसावे, जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वाहतूक वळवली

या मार्गावरील वाहतूक नवापूरकडे जाण्यासाठी अवजड वाहतूक करणखेडा गावाजवळून धुळवद गावाकडे (राज्य मार्ग ११) वरून वळविण्यात आली. गुजरातकडे जाणारी वाहतूक धानोराकडून नटावद आर्डीतारामार्गे तर इतर लहान वाहनांसाठी वाहतूक धानोरा गावातून पर्यायी पुलावरून वळविण्यात आली आहे. पुलाचा दोन्ही बाजूने मार्ग बंद केले आहेत. पोलिस बंदोबस्त तैनात केले आहे.

स्तंभ ढासळल्याने पूल कोसळला

पुलाच्या पाहणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाचे बांधकाम स्तंभ हे दगडी बांधकामाचे होते. त्यावर आर सी सी स्लॅबचे बांधकाम करण्यात आले होते. दगडी बांधकामाचे स्तंभ कोसळल्याने सदर पूल क्षतिग्रस्त झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे.

अशोकचे दैव बलवत्तर

धानोरा येथील अशोक फत्तू वळवी यांची शेती पुलाजवळ आहे. सकाळी घरून शेतात जाण्यासाठी नऊचा सुमारास अशोक या पुलावरूनच चालत गेला. त्याचवेळी पुलाचा दुसऱ्या टोकाला अशोक पोचणार तोच जोराचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर जेथून चालत आला त्याच पुलाचे दोन तुकडे झाले होते. त्यावेळी एकदम भीती भरली. देवाचे नामस्मरण केले. अशी माहिती ‘अशोक’ ने सकाळ शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT