Arrested criminal esakal
उत्तर महाराष्ट्र

सख्या बहिणीचा खून करुन रात्रीच उरकला अंत्यविधी; आरोपी गजाआड

आपल्या बहिणीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय व त्याच्यासोबत ती पळून जायच्या बेतात असल्याचा भावाच्या मनात राग होता.

भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : बावीस वर्षीय बहिणीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय व त्याच्यासोबत ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग मनात धरून तिला मारहाण करून, गळफास लावून खून करत सोमवारी (ता.१३) रात्रीच तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. १५) उघडकीस आली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने संशयित भावास गजाआड केले आहे.

बुधवारी (ता.१५) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना संदिप रमेश हालोर (वय-२४) रा.हट्टी (ता.साक्री) याने त्याची बहिण पुष्पा हिचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेवून तिस मारहाण करत गळफास लावून मारले व रात्रीच तिचा अत्यंविधी आटोपून टाकला, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने निजामपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, उपनिरीक्षक दिपक वारे, हवालदार कांतीलाल अहिरे, पोलिस नाईक संदिप ठाकरे, पोलिस शिपाई नरेंद्र माळी, अवधुत होंडे यांच्या तपास पथकाने हट्टी गाव परिसरात रवाना होवून बातमीची खातरजमा केली असता आरोपी संदीप हालोर हा गावातच मिळून आला.

दरम्यान पोलिसांनी त्यांच्या तपास कौशल्याव्दारे त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली व सांगितले कि, हट्टी गावाशिवारातील शिवमेंढा येथे रात्रीचे तीन वाजेचे सुमारास त्याची बहीण पुष्पा रमेश हालोर (वय-२२) हिचे धुळे तालुक्यातील नवलाणे येथील सागर बागुल याचे सोबत प्रेमसंबंध असल्याने ती पळून जाण्याच्या बेतात असल्याने, त्याचा राग मनात धरून त्याने तिचे अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार करत, गळफास लावून जीवे ठार मारण्याच्या इराद्याने ढकलून देत तिचा जीव जाईपर्यंत तेथेच थांबून राहिला व त्यांनतर घरी जावून पुष्पा हिने स्वत:च्या हाताने गळफास घेवून मयत झाल्याचे भासवून आई व मित्रांसह गावातील लोंकाना खोटी माहिती दिली व पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यविधी करते वेळी तिचे अंगावरील सर्व कपडे तसेच गळफास तयार केलेली साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दहनात टाकून पुरावे नष्ट केल्याचे सांगितले.

पोलिस नाईक संदीप ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक दीपक वारे घटनेचा पुढील तपास करीत आहेत. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, उपनिरीक्षक दीपक वारे, हवालदार कांतीलाल अहिरे, पोलिस नाईक संदीप ठाकरे, पोलिस शिपाई नरेंद्र माळी, अवधुत होंडे यांनी ही चोख कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाची घरे खरंच परवडणारी? मुंबईतील घरांच्या किमती एक काेटीच्या पुढे

Lightning Strike Death : साताऱ्यात अवकाळीचे तांडव! वीज अंगावर कोसळून महिला ठार; वाई-खंडाळ्यात 35 निष्पाप मुक्या जीवांचा अंत

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT