उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : वागदी (ता. नवापूर) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सख्ख्या भावाचा खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (brother murder brother in nandurbar crime news)

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरेश गावित व विश्वास गावित हे दोघे सख्खे भाऊ असून, लहान भाऊ विश्वास याने यापूर्वी गावातील महिलेस मारहाण केल्याने त्याच्यासह मोठा भाऊ नरेश यावरही गुन्हा दाखल होऊन न्यायालयात खटला सुरू आहे. मोठा भाऊ नरेश याने विश्वास याला ‘तू महिलेस मारहाण केली नसती, तर माझ्यावर गुन्हा दाखल नसता.

तुझ्यामुळे मी विनाकारण यात गुंतलो असून, माझा पैसा व वेळ वाया जात आहे.’ असे म्हटल्यावरून शुक्रवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या दरम्यान दोघांत भांडण होऊन लहान भाऊ विश्वास याला राग येऊन त्याने राहत्या घरी नरेश याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घटनेची माहिती मिळताच नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, विसरवाडी पोलिस ठाणे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, अमलदार यांनी वागदी गावात घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

सरिता नरेश गावित यांच्या फिर्यादीवरून संशयित विश्वास गावित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर संशयित विश्वास फरारी आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT