crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शेतकरी कुटुंब शेतात गेले अन... सव्वा लाखाचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मोहाडी प्र. डांगरी (ता. धुळे) येथील शेतकरी कुटुंब शेतात गेले असता घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे एक लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना शनिवारी (ता. २१) दुपारी घडली.

या प्रकरणी सोनगीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.(burglary at farmer home dhule crime news)

मोहाडी येथील संतोष कोंडू धनगर कुटुंबातील सदस्यांसह सकाळी आठच्या सुमारास कुलूप लावून शेतात गेले. दुपारी एकच्या सुमारास शेजाऱ्याने घराचा दरवाजा उघडा असल्याचे कळविल्यावरून ते कुटुंबासह परत आले.

तेव्हा घराचे कुलूप उघडून आतील लोखंडी कपाट फोडलेले दिसून आले. कपाटातील चांदीच्या पाटल्या, हातातले कडे, पैंजण असे सुमारे एक किलोग्रॅम चांदी, १९ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या व २० हजार रुपयांची रोकड असा सुमारे एक लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे व घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्या.

संतोष धनगर यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT