Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दस्तऐवजात फेरफार करून फसविले; पोलिसांत 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (जि. नाशिक) : प्लॉटची खरेदी करून केवळ नाव न लावल्याने परस्पर प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी सात जणांवर पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (case registered against 7 people police for selling plots to each other due to purchase of plots not naming them dhule news)

याबाबत बुधा जाणू बागूल (वय ५७, रा. बागूलपाडा, ता. साक्री) यांनी पिंपळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पिंपळनेर शिवारात त्यांनी गट नं. १२०३/१/२/३ पैकी २३८ प्लॉट श्रीमती निर्मलाबाई रमेश सोनार (रा. पिंपळनेर) यांच्याकडून रजिस्टर पद्धतीने विकत घेतला होता.

मात्र, तत्कालीन तलाठ्याने फिर्यादीने दाखल केलेल्या क्र. २ सूचीची दखल घेतली नव्हती. म्हणून अनवधनाने सातबारा उतारा निर्मला सोनार यांच्या नावे राहिला होता. त्याचा गैरफायदा घेऊन दस्तऐवजात फेरफार करण्यात आला. हा प्लॉट परस्पर विक्री करण्यात आला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने नागेश रमेश सोनार (रा. सोयगाव, ता. मालेगाव), मनीषा रवींद्र विंचूरकर, मीनल संजय अंतापूरकर, रमेश सुदाम सोनार, रुणाली गणेश पिंगळे (रा. सोयगाव), सरोजिनी हिंमत जाधव (रा. नाशिक) व तौफिक हसन शेख (रा. पिंपळनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक डी. एम. मालचे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT