chalisgaon dhule highway unmesh patl tweet
chalisgaon dhule highway unmesh patl tweet 
उत्तर महाराष्ट्र

खासदारांचे व्टिट ः दोन दिवसात धुळे रस्त्याचे काम सुरु 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव ते धुळे महामार्गाची दोनच वर्षांत वाट लागली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ताने अनेकांचे बळी घेतले आहे. अनेकांना खड्ड्यांमुळे कायमचे अपंगत्व आले असून काहींना गंभीर दुखापत बरी करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागले आहेत. यासंदर्भातील एका दांपत्याची व्यथा ट्‌विटरवर पोस्ट केलेली होती. त्याला उत्तर देताना खासदार उन्मेष पाटील यांनी "येत्या दोन दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल' असे "ट्‌विट' केले आहे. 
चाळीसगाव- धुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडलेल्या पती- पत्नीचा अपघात होऊन दवाखान्यात उपचारासाठी तब्बल 90 हजार रुपये मोजावे लागले. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात असे अपघात दररोज होत आहेत. मंगळवारी (5 ऑक्‍टोबर) रात्री आठच्या सुमारास दोन दुचाकी घसरल्या. यातील औरंगाबादच्या दांपत्याला दवाखान्यात 90 हजार रुपये मोजावे लागल्याच्या घटनेबाबत एकाने "ट्‌विट' केले होते. त्याला जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी उत्तर देत, दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असल्याचे "ट्‌विट' करून उत्तर दिले. यामुळे या रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरूवात होणार असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. 

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया 
चाळीसगाव -धुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली असून या संदर्भात गेल्या महिन्यापासून "सकाळ'ने या रस्त्याचा विषय सातत्याने लावून धरला आहे. या बातम्यांचे "फेसबुक'वर वाचन होत असताना वाचकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाने मातीमिश्रीत मुरुम टाकुन खड्डे भरले होते. या खड्ड्यांमधील माती मिश्रीत मुरुम वाहनाच्या वेगाने भुरर्कन उडून गेला. या खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी होत असताना त्याची दखलच घेतली गेली नाही. 

प्रत्यक्षात कामाला सुरुवात कशी? 
रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार उन्मेष पाटलांनी "ट्‌विट' केले असले तरी प्रत्यक्षात काम सुरू कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्याचे भरभक्कम काम करावे. जेणेकरून पुन्हा अशी परीस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे. परतीचा पाऊस ओसरला असला तरी पुन्हा पावसाळा सुरू होण्यास सात महिने बाकी आहेत. त्यामुळे रस्त्याचे चांगले काम झाले तरच उपयोग होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT