उत्तर महाराष्ट्र

चेतक फेस्टीव्हल : सीसीटिव्हींची नजर 

सकाळ वृत्तसेवा

सारंगखेडा : देशात प्रसिद्ध असलेल्या, तीन राज्यांच्या सीमावर्ती असलेला येथील एकमुखी दत्त यात्रोत्सव व आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेतक फेस्टिव्हल पाहण्यासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह गुन्हेगार शोधपथकही कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

त्रिशतकी परंपरा असलेल्या येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सव आणि त्या अनुषंगाने भरणाऱ्या अश्व बाजाराला चेतक फेस्टिव्हलच्या रूपाने नवा आयाम दिला आहे. खानदेशच्यादृष्टीने ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. गेल्या वर्षी या उत्सवाला वीस लाखांहून अधिक भाविक व पर्यटकांनी भेट दिली होती. येथील अश्व बाजार महिनाभर चालतो. देशाच्या कानाकोपऱ्यातुन व्यापारी येथे येतात. त्यातून पाच कोटीहून अधिक उलाढाल होत असते. यात्रोत्सवातील उलाढाल, वाढलेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेता, सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर असते. गेल्या वर्षी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्या दृष्टीने यंदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिस व यात्रोत्सवात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्यातून यासाठी जादा कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. 

मोक्याचा ठिकाणी कॅमेरे 
यात्रेच्या गर्दीच्या ठिकाणी सह चेतक फेस्टिव्हल व टेन्ट सिटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे . त्यानुसार नजर ठेवण्यासाठी दोन कंट्रोल रूम ठेवण्यात येणार आहे . या साठी महिला पोलीस कर्मचारी काम पाहतील , गेल्या वर्षी यात्रोत्सवातच मोठया प्रमाणावर चोरीचे प्रमाण वाढले होते . यंदा त्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे . 

पोलीस दलाचे पथक 
यात्रेत तीन राज्यांसह अन्य राज्यांतूनही भाविक येतात . त्यात काही गुन्हेगार असतात . त्या संदर्भात काळजी आणि शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे . मुंबई . नंदूरबार , धुळे येथून काही स्वयंसेवी संस्था , संघटनांचे स्वयंसेवकही येथे येतील , तसेच परिसरातील पोलीस पाटील यांच्या मदतीला राहतील. यात्रेतील अग्नी शमन दलाचे बंब , पथक यात्रा स्थळी असेल , अन्य पालिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत . 

असे असेल पोलिस दल 
अधिकारी - १० 
पोलीस कर्मचारी - ८० 
महिला पोलीस - ९० 
गृहरक्षक दल - ८० 
श्वानपथक - १ 
गुन्हेगार शोध पथक -१ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT