On the coronation day of Chhatrapati Sambhaji Maharaj, officials of Purnakriti Putalanirman Samiti etc. present at the salute to his statue in Sambhaji Garden. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : छत्रपती संभाजी महाराजांचा धुळ्यात राज्याभिषेक दिन

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मंगळवारी (ता. १६) छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळानिर्माण समितीतर्फे साजरा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मंगळवारी (ता. १६) छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळानिर्माण समितीतर्फे साजरा करण्यात आला.

शहरातील संभाजी गार्डन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पंचामृत व दुग्धाभिषेक करण्यात आला. (Chhatrapati Sambhaji Maharaj Coronation Day in Dhule news)

स्मारक समितीचे अध्यक्ष नाना कदम यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्य रक्षणासाठी खर्ची केले.

कमी वयात सर्वांत जास्त युद्धे करून शत्रूवर विजय प्राप्त केले. स्वराज्याचे पालनपोषण व संरक्षण केले. हा प्रेरणादायी इतिहास धुळे शहरात त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जिवंत राहावा यासाठी स्मारक समिती दहा वर्षांपासून प्रयत्नशील आहे.

लवकरच छत्रपती संभाजी महाराजांचे हे देखणे स्मारक धुळ्यात उभे राहील. ३० फूट उंचीचे संभाजीराजांचे महाराष्ट्रातील हे पहिले स्मारक असेल.

स्मारक समिती व कोअर कमिटीतर्फे लवकरच स्मारकाचे लोकार्पण होईल, असे श्री. कदम म्हणाले.

स्मारक समितीचे सचिव अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, रणजित भोसले, हृषीकेश पाटील, आनंद पवार, ज्ञानेश्वर पाटील, अकबर शेख, हिरामण पाटील, संदीप पाटोळे, दिलीप पाटील, सुनील ठाणगे, बापूसाहेब पाटील.

श्याम निरगुडे, राजन बागल, रजू मोरे, साहेबराव देसाई, अमर फरतडे, मनोज ढवळे, आबा कदम, निंबा मराठे, चंद्रकांत महाजन, कमलाकर पाटील, शरद बिरारी, प्रशांत तनेजा, रवींद्र तनेजा, मनोज राजपूत, भूषण पाटील, रवींद्र पवार, मनोज पवार आदी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT