Child dies after being bitten by crushed dog dhule news
Child dies after being bitten by crushed dog dhule news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने जखमी बालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे (जि. धुळे) : हातनूर (ता. शिंदखेडा) येथे महिन्याभरापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील तब्बल २२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. यातील १२ वर्षीय लहान (Child) बालकांच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. (Child dies after being bitten by crushed dog dhule news)

त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र शनिवारी (ता. ४) त्याला त्रास जाणवू लागल्याने पुन्हा उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान रविवारी (ता. ५) सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हातनूर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडला होता. २ फेब्रुवारीला हातनूर गावातील २२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. यातील बालक विराज सयाजी जगताप (वय १२) याच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

विराजची प्रकृती सुधारल्याने त्याला घरी पाठविण्यात आले होते, मात्र घटनेच्या एक महिन्यानंतर विराजला पुन्हा रेबीजचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. शवविच्छेदन अहवालानंतरच विराजचे मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

विराज एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. २२ जणांना पिसासळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ११ जणांवर चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व ११ जणांवर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. विराजचा मृत्यू झाल्याने चावा घेतलेल्या २१ जणांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT