Dhule Leopard News : बोरकुंडजवळील (ता. धुळे) होरपाडा शिवारात बिबट्याने सहावर्षीय स्वामी दीपक रोकडे यास उचलून नेत ठार केले. या गंभीर घटनेकडे वन विभागासह पोलिस यंत्रणेने दुर्लक्ष केले.
पंचनाम्यासाठी जबाबदार घटक लवकर पुढे न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी बालकाचे पार्थिव थेट महामार्गावर नेले. (Child killed in leopard attack in dhule news)
त्यास खाटेवर ठेवत धुळे-सोलापूर महामार्गावरील शिरूड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर संबंधित विभागाने पंचनामा केला.
होरपाडा शिवारात दीपक रोकडे परिवारासह कापूस वेचणीसाठी गेले होते. दुपारी घरी येत असताना बिबट्याने सहावर्षीय स्वामीला उचलले. आरडाओरडा केल्यानंतर त्याची सुटका केली. तोपर्यंत स्वामी ठार झाला होता.
ही घटना गावात कळताच ग्रामस्थांनी शेती शिवारात धाव घेतली. वन विभागाशी संपर्क करूनही पंचनाम्यासाठी कुणी येत नसल्याने ग्रामस्थ संतापले. त्यांनी स्वामीचे पार्थिव थेट महामार्गावर आणले. शिरूड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.
या घटनेने बोरकुंड परिसर हादरला आणि संतप्त झाला. निष्पाप स्वामीच्या निधनामुळे शोक प्रकट झाला. महिन्यापासून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होऊनही दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला. त्याचा घोषणाबाजीतून निषेध केला. या दुःखद घटनेमुळे दसरा सणावर विरजण पडले.
तीन दिवसांत दुसरी घटना
बोरकुंडजवळील नंदाळे शिवारातही तीन दिवसांपूर्वी नंदाळेतील आदिवासी बालकाला बिबट्याने उचलून नेत ठार केले. त्याकडे जबाबदार शासकीय घटकाने दुर्लक्ष केले. ही घटना गांभीर्याने हाताळली असती तर निष्पाप स्वामीचा जीव गेला नसता. या घटनेची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, त्याची दहशत संपुष्टात आणावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.