snow fall vineyard.jpg 
उत्तर महाराष्ट्र

द्राक्षपंढरीत थंडीचा प्रकोप...दवबिंदुचे झाले बर्फ!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : निफाडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत थंडी अचानक वाढल्याने द्राक्षपंढरीला कापरे भरले असुन थंडीने या हंगामातील निचांक गाठला आहे.
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर शुक्रवारी अंश २.४ या हंगामातील तापमानाची नोंद झाली आहे. कारसुळ - नारायण टेंभी परीसरात कादवा नदी काठावर दवबिंदु गोठल्याने मका तसेच पाचटावर बर्फाची चादर पहायला मिळाली.
 जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशात बर्फ दृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाल्याने उत्तरेकडून येणार्‍या थंड वाऱ्यामुळे थंडीचे जोरदार आगमन झाले असल्याने निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. 

शेतकरी धास्तावले...
आधीच अवकाळी पावसाच्या तडख्यातुन द्राक्ष बागांना शेतकऱ्यांनी वाचवत उभे केलेले द्राक्ष पीक आता थंडीच्या संकटात सापडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार हबकले आहे. कडाक्याच्या थंडीने निफाड गारठल्याने आज ठिकठिकाणी शेकोट्या  पेटवून नागरिकांनी उब मिळविण्याचा प्रयत्न करत आहे .

नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडण्याची भीती... 

या थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला या थंडीचा फायदा होणार आहे. थंडीमुळे नुकतीच फुगवन स्टेजला असलेल्या द्राक्षमन्यांना तडे जाण्याची भीतीने ठिकठिकाणी द्राक्ष बागात उत्पादकांनी द्राक्षघडाला पेपर लावले आहे. मात्र, थंडीचा जोर असाच राहिल्यास द्राक्षांची मोठी नुकसान होऊन द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान थंडीच्या वाढत्या प्रकोपाने तालुक्यातील शेत शिवारात असलेल्या उसतोंड कांमगारांना याचा मोठा फटका बसला आहे. तशीच परीस्थिती विटभट्यांवर काम करणारे मजुरांची झाली आहे तर, शहरी भागात सकाळी मार्निंग वॅाकला जाणारेही थांबले आहेत. तसेच, शालेय विद्यार्थ्यांवर देखील परिणाम झाला आहे. 

माझ्या शेतावर बर्फाची चादर...
 
मोठ्या कष्टाने द्राक्ष बागा फुलवित असतांना अवकाळीचं संकट आले त्याला तोंड देत द्राक्ष वाचवलीत. परंतु,  हंगाम ऐन भरात आलेला असतांनाच आजच्या थंडीने द्राक्षासह मकाच पाचट गवताचे पाते  यांच्यावरील दवबिंदु गोठल्याने माझ्या शेतावर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र होते त्यामुळे मी धास्तावलो आहे.

अतुल ताकाटे, कारसुळ, ता निफाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT