Recruitment  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Recruitment News: कोतवाल, पोलिस पाटील रिक्त पदासाठी भरती सुरु; या संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Dhule News: जिल्ह्यातील धुळे व शिरपूर उपविभागांतर्गत कोतवाल व पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरतीसाठी ४ ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

कोतवाल भरतीसाठी धुळे तालुक्यातील १४, साक्री तालुक्यातील ७, शिरपूर तालुक्यातील २२, तर शिंदखेडा तालुक्यातील ३१ रिक्त पदांचा समावेश आहे. (Collector Abhinav Goyal appeal Apply for post of Kotwal, Police Patil dhule news)

पोलिस पाटील पदासाठी धुळे उपविभागातील ७७, तर शिरपूर उपविभागातील ५२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

कोतवाल पदासाठी https://dhulekotwal.mahbharti.com या संकेतस्थळावर व पोलिस पाटील पदासाठी http://ww38.ppdhule.mahabharti.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. भरतीकरिता परीक्षा शुल्क नमूद संकेतस्थळांवर दिलेल्या प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

रिक्तपदाची सज्जानिहाय, गावनिहाय तसेच पदाचे आरक्षणाबाबत सविस्तर माहिती, पदासाठीच्या अटी व शर्ती, पात्रता तसेच अर्ज करण्याच्या पद्धतीची माहिती धुळे जिल्ह्याच्या https://dhule.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, गाव चावडी येथे यासंबंधी जाहिरात पाहता येईल.

उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच संकेतस्थळाला भरतीप्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT