On the occasion of the inauguration of Panpoi, District Superintendent of Police P. R. Patil and police personnel.
On the occasion of the inauguration of Panpoi, District Superintendent of Police P. R. Patil and police personnel.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तहानलेल्यांसाठी 30 पाणपोईंची उभारणी; पोलिस दलाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : कायदा व सुव्यवस्था राखत सर्वत्र शांतता ठेवण्याचे कर्तव्य बजावत गुन्हेगारांना पकडणे व त्यांच्यावर कारवाई करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता कायद्याचा रखवालीसोबतच सामाजिक उपक्रमातही पोलिसांचे भरीव कार्य सध्या जिल्ह्यात सुरू आहे. (Construction of 30 water tanks by police force for thirsty people Nandurbar News)

त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षापासून शहरभर कामानिमित्त फिरणाऱ्या तहानलेल्यांना थंडगार पाणी मिळावे, म्हणून जिल्ह्यात ३० ठिकाणी पोलिस दलातर्फे पाणपाईंची उभारणी केली आहे.

जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता खूप वाढलेली असते. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात जवळपास ४० ते ४४ अंशाच्या तापमान असते. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे मजुरीसाठी बाहेरगावी जातात. तसेच, उन्हाळ्यामध्ये लग्नसराई किंवा धार्मिक कार्यक्रम जास्त असल्यामुळे बहुतांश लोक हे प्रवास करतात. सर्वसामान्य नागरिक देखील खरेदीसाठी बाजारात आलेले असतात.

जे विद्यार्थी शिक्षणासाठी व कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी परत येतात, अशा सर्वांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची थंडगार बाटली घेणे शक्य होत नाही.

अशा सर्व नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पाण्याची सोय व्हावी तसेच त्यांना नि:शुल्क पाणी उपलब्ध व्हावे आणि सर्वात महत्त्वाचे पाणपोईची दररोज स्वच्छता करून त्यात स्वच्छ व थंडगार पाणी भरण्यात यावे अशी संकल्पना नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्हा मासिक गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे समोर मांडली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आपापल्या पोलिस ठाणे हद्दीत सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय करून दिली आहे.

याठिकाणी उभारल्या पाणपोई

नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलिस ठाणे हद्दीत स्टेट बँक कॉलनी, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीत रनाळा, आष्टा व कोरीट नाका, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत- काकाचा ढाबा जवळ, धानोरा, नवापूर पोलिस ठाणे हद्दीत- पोलिस ठाणेसमोर, अग्रवाल भवन व सामान्य रुग्णालय, विसरवाडी पोलिस ठाणे हद्दीत-जामा मशिदीजवळ, स्टेट बँक, शहादा पोलिस ठाणे हद्दीत, बसस्थानक व जनता चौक, सारंगखेडा, वडाळी, धडगाव, म्हसावद, कोचरा माता मंदिर व साई हॉस्पिटलजवळ,

अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीत-पोलिस ठाण्यासमोर व खापर दुरक्षेत्र येथे, तळोदा पोलिस ठाणे हद्दीत-तहसील कार्यालयाजवळ, आंबेगव्हाण फाटा व बोरद, मोलगी पोलिस ठाणे हद्दीत- पोलिस ठाण्यासमोर व बैल बाजार येथे व शहर वाहतूक शाखेसमोर अशा तीस ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलिस दलामार्फत नंदुरबार जिल्ह्यात पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT