currupt headmaster.png 
उत्तर महाराष्ट्र

मुख्याध्यापकानेच केले 'असे' लाजीरवाणे कृत्य...की गेला थेट जेलमध्येच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाच हजार रुपयांच्या लाचप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्याध्यापकाची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. मिलिंद जगन्नाथ घाटकर असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून, ते नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वेळुंजे आश्रमशाळेत कार्यरत होते. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

असा घडला प्रकार...

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित वेळुंजे आश्रमशाळेमध्ये कार्यरत असलेल्या तक्रारदाराने सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलाचा प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठवून मंजूर करायचा होता. त्यासाठी आश्रमशाळेचा लाचखोर मुख्याध्यापक मिलिंद घाटकर याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पथकाने सापळापूर्व पडताळणी केली असता, लाचखोर मुख्याध्यापकाने पंचासमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्र्यंबकेश्‍वर पोलिसांत गुन्हा दाखल करून लाचखोर घाटकर यांना अटक केली होती.

त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात

बुधवारी (ता. 1) सायंकाळी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. गुरुवारी (ता. 2) कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT