Cotton News
Cotton News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Cotton News : तालुक्यात कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात; बळीराजा खरिपासाठी सज्ज

सम्राट महाजन

Nandurbar News : येणाऱ्या प्रत्येक अस्मानी संकटांना यशस्वीरीत्या तोंड देण्याची सवय झालेला बळीराजा आता खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. तळोदा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

त्यामुळे शेतकरी आता चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. दरम्यान, तालुक्यात यंदाही कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असणार आहे, तसेच सोयाबीन, ज्वारीलादेखील शेतकऱ्यांची पसंती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (Cotton area in Taloda taluka is large Farmer ready for Kharip Now waiting for rain Soybeans sorghum preferred Nandurbar News)

मागील चार महिन्यांत तळोदा तालुक्यात अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. मात्र तालुक्यातील शेतकरी वर्ग सर्व दुःख बाजूला ठेवून खरीप हंगामातील लागवडीच्या दृष्टीने तयारीला लागला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीचे नियोजन पूर्ण केले असून, त्यादृष्टीने शेतीची मशागतदेखील केली आहे. तळोदा तालुक्यात उसाचा पेरा पकडून जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रांवर या वर्षीच्या खरीप हंगामासाठी पेरणीचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.

यात दर वर्षीप्रमाणे या वर्षीही कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असणार असून, सुमारे नऊ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाला सुरवात झाली नसली तरी काही बागायदार शेतकऱ्यांनी, कपाशीची लागवड केली असून, आजअखेरपर्यंत तालुक्यात जवळपास ४७१ हेक्टरवर लागवड झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कपाशीच्या बरोबरीनेच तालुक्यातील शेतकऱ्यांची पसंती उसालादेखील असून, यंदादेखील आठ हजार ५०० हेक्टरवर ऊसलागवड होईल असे म्हटले जात आहे.

तालुक्यात एकेकाळी भुईमूग, सूर्यफूल आदींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत होते, आता मात्र शेतकरी या पिकांऐवजी सोयाबीन लागवडीला पसंती देत असून, एक हजार ७९० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे.

मूग, उडीद, बाजरीच्या लागवडीकडे शेतकरी काही वर्षांपासून पाठ फिरवीत असून, तुलनेने ज्वारी, मका, तूर व तांदळाचे क्षेत्र वाढत आहे. २५९ हेक्टरवर तांदळाचे, ९८७ हेक्टरवर तुरीचे, एक हजार ६०३ हेक्टरवर मक्याचे, तर एक हजार ८७७ हेक्टरवर ज्वारीची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एक दृष्टिक्षेप पीकलागवडीवर

-तालुक्यात लक्ष्यांकापेक्षा उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर, ऊस सर्व दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांचा उसाकडे कल.

-कमी काळात जास्त प्रमाणात पैसे मिळवून देणारे पीक असल्याने मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील शेतकऱ्यांची कपाशीला पसंती.

-तालुक्यात खरिपातील भुईमूग, सूर्यफूल, मूग, उडीद यांची अगदी नगण्य लागवड.

-एकेकाळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे खरिपातील बाजरीचे पीक आता फक्त सातपुड्याच्या दुर्गम भागापर्यंत मर्यादित.

२०२२-२३ खरिपाची आकडेवारी

(सर्व आकडेवारी हेक्टरमध्ये)

पीक लक्ष्यांक प्रत्यक्षात लागवड

तांदूळ २५९ १६३

ज्वारी १८७७ १६५१

बाजरी १६ १०

मका १६०३ ४३५

तूर ९८७ ५३३

मूग १९६ ३०

उडीद १३० ५७

सूर्यफूल १७ ००

सोयाबीन १७९० २०१५

कपाशी ९७९८ ८८१३

ऊस ८५१० १०४९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT